सर्वांच्या बजेटमध्ये बसणार OnePlus चा आगामी 5G Phone; क्वॉलकॉम प्रोसेसरसह उडवणार शाओमी-रियलमीची झोप
By सिद्धेश जाधव | Published: February 2, 2022 05:12 PM2022-02-02T17:12:05+5:302022-02-02T17:12:12+5:30
OnePlus Budget 5G Phone: वनप्लस यावर्षी OnePlus 10 Ultra, 10R, Nord CE 2, आणि Nord 2T स्मार्टफोनसह OnePlus Nord CE 2 Lite 5G देखील सादर करणार आहे.
OnePlus नं टेक विश्वात निवडक अँड्रॉइड स्मार्टफोन सादर करणारी कंपनी अशी ओळख निर्माण केली होती. परंतु सुरुवातीला फक्त फ्लॅगशिप किलर स्मार्टफोन आणणारी कंपनी आता बजेट सेगमेंटमध्ये देखील शिरकाव करत आहे. कंपनी यावर्षी OnePlus 10 Ultra, 10R, Nord CE 2, आणि Nord 2T स्मार्टफोनसह OnePlus Nord CE 2 Lite 5G देखील सादर करणार आहे. हा फोन 20,000 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
OnePlus Nord CE 2 Lite 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स
Smartprix आणि OnLeaks नं दिलेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा फुलएचडी अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. हा स्मार्टफोन Android 11 आधारित Oxygen OS वर चालेल. यात Qualcomm चा Snapdragon 659 5G चिपसेट देण्यात येईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात येईल.
OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी मिळेल जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चे दोन अन्य सेन्सर मिळतील. वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन यावर्षी दुसऱ्या तिमाहीत ग्राहकांच्या भेटीला येईल. तर 20,000 रुपयांच्या आत हा रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाला चांगली टक्कर देऊ शकतो.
हे देखील वाचा:
- स्वस्त iPhone आणि iPad लवकरच होणार भारतात लाँच; अँड्रॉइड युजर्स देखील करतील स्विच अशी किंमत
- 6000mAh पर्यंतची बॅटरी असलेले हे Redmi फोन्स देतील दिवसभराचा बॅकअप; किंमत 12,500 पासून सुरु