अपेक्षाभंग! स्वस्त नसेल OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:57 PM2021-06-01T18:57:34+5:302021-06-01T19:00:29+5:30

OnePlus Nord CE 5G will be price: OnePlus Nord CE 5G ची संभाव्य किंमत समोर आली आहे. जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर त्वरित किंमत बघून घ्या.   

OnePlus Nord CE 5G Indian Price leaked before launch on 10 june  | अपेक्षाभंग! स्वस्त नसेल OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत  

OnePlus Nord CE 5G को प्री-ऑर्डर केल्यावर 2,699 रुपयांच्या भेटवस्तू ग्राहकांना दिल्या जातील.

Next

परवडणारे 5G फोन्स सादर करण्याची शर्यत सर्व स्मार्टफोन निर्माता कंपन्यांमध्ये सुरु आहे. या शर्यतीत आता प्रीमियम स्मार्टफोन निर्माता वनप्लस देखील सहभाग घेत असल्याचे दिसत आहे. अलीकडेच बातमी आली होती कि OnePlus Nord CE 5G भारतात लाँच केला जाणार आहे. 10 जूनला लाँच होणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G 5G चिपसेटसह 64-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि इतर अनेक अपग्रेड स्पेसिफिकेशन असतील. रिपोर्ट्सनुसार अपकमिंग OnePlus फोन मिड-रेंज कॅटेगरीमध्ये लाँच केला जाईल.  (OnePlus Nord CE 5G will be priced between 25000 to 30000) 

कंपनीने नवीन घोषणा केली आहे त्यानुसार, OnePlus Nord CE 5G को प्री-ऑर्डर केल्यावर 2,699 रुपयांच्या भेटवस्तू ग्राहकांना दिल्या जातील. मात्र, यासोबत कोणकोणते गिफ्ट दिले जाणार आहेत, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. OnePlus Nord CE 5G प्री-ऑर्डर 11 जूनपासून सुरु होईल आणि OnePlus Nord CE 5G चा पहिला सेल भारतात 16 जूनपासून सुरु होईल. भारतात OnePlus Nord CE 5G च्या किंमत छोट्या मॉडेलची किंमत जवळपास 25,000 ते 30,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते.  

OnePlus Nord CE 5G मध्ये काय असेल...  

OnePlus Nord CE 5G मध्ये बेसिक स्पेसिफिकेशन खालील प्रमाणे असणार आहेत.   

  • Nord CE 5G मध्ये 6.43-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट.  
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC असणार आहे. हा फोन में Xiaomi Mi 10i आणि Samsung Galaxy A52 5G यांना टक्कर देणार आहे.   
  • कॅमेरा- 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येईल.   
  • साईड माऊंटेड फिंगर प्रिंट स्कॅनर, फ्रंटला होल पंच कॅमेरा असेल.   
  • रंग- red-green-yellow mix आणि pink-blue-purple combo मध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.  

Web Title: OnePlus Nord CE 5G Indian Price leaked before launch on 10 june 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.