22 हजारांत OnePlus चा दमदार 5G फोन, 6GB RAM आणि 64MP Camera सह लाँच
By सिद्धेश जाधव | Published: April 20, 2022 01:07 PM2022-04-20T13:07:42+5:302022-04-20T13:07:54+5:30
OnePlus Nord N20 5G स्मार्टफोन 64MP Camera, 6GB RAM, Snapdragon 695 चिपसेट, 33W फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे.
OnePlus लवकरच भारतात दोन नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. यात फ्लॅगशिप ग्रेड OnePlus 10R आणि मिडरेंज OnePlus Nord CE 2 Lite चा समावेश असू शकतो. परंतु तिकडे अमेरिकेत कंपनीनं आणखी एक स्वस्त स्मार्टफोन OnePlus Nord N20 5G नावानं लाँच केला आहे. यात 64MP Camera, 6GB RAM, Snapdragon 695 चिपसेट, 33W फास्ट चार्जिंग आणि 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
OnePlus Nord N20 5G चे स्पेसिफिकेशन्स
वनप्लस नॉर्ड एन20 5जी मध्ये 6.43 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले पंच-होल डिजाईनसह मिळतो. यात हाय रिफ्रेश रेटसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. हा 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिट ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी मोबाईल फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
OnePlus Nord N20 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड आक्सिजनओएस 11 वर चालतो. यात क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी आहे. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
किंमत
अमेरिकन बाजारात OnePlus Nord N20 5G चा एकच व्हेरिएंट आला आहे. तिथे या फोनची किंमत 282 डॉलर म्हणजे जवळपास 21,500 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी नॉर्ड एन सीरिज भारतात सादर करत नाही त्यामुळे हा फोन देशात येण्याची शक्यता कमी आहे.