OnePlus ने लाँच केला आपला सर्वात स्वस्त 5जी फोन; ‘अशी’ आहेत OnePlus Nord N200 5G ची वैशिष्ट्ये

By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2021 12:27 PM2021-06-16T12:27:58+5:302021-06-16T12:28:46+5:30

OnePlus Nord N200 5G Launch: OnePlus Nord N200 5G यूएस आणि कॅनडामध्ये लाँच करण्यात आला आहे, हा कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे.  

OnePlus Nord N200 5G Launched Specs Price Sale offer  | OnePlus ने लाँच केला आपला सर्वात स्वस्त 5जी फोन; ‘अशी’ आहेत OnePlus Nord N200 5G ची वैशिष्ट्ये

OnePlus Nord N200 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Next

कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर OnePlus ने आज आपला स्वस्त 5G फोन OnePlus Nord N200 सादर केला आहे. OnePlus Nord N100 चा उत्तराधिकारी कंपनीने 90Hz FHD+ डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 480 चिपसेट आणि 5,000mAh बॅटरी अश्या फीचर्ससह यूएस आणि कॅनडामध्ये लाँच केला गेला आहे. लवकरच हा फोन भारतासह जगभरात लाँच केला जाईल. (OnePlus Nord N200 5G launched in USA and Canada at $239.99) 

OnePlus Nord N200 5G चे स्पेसिफिकेशन्स 

वनप्लस नॉर्ड एन200 5जी मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियोसह 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.49 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच-होल डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो आक्सिजनओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा 5जी इनेबल्ड स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट आणि एड्रेनो 619 जीपीयू देण्यात आला आहे. वनप्लस नॉर्ड एन200 मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, OnePlus Nord N200 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेंस देण्यात आली आहे. सेल्फीसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. 

सिक्योरिटीसाठी OnePlus Nord N200 5G मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आहे. हि बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

एकाच व्हेरिएंटमध्ये आलेल्या या फोनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत $239.99 ठेवण्यात आली आहे, 25 जूनपासून हा फोन यूएस आणि कॅनडामध्ये विकत घेता येईल. भारतीय चलनात हि किंमत अंदाजे 17,600 रुपये इतकी होते.  

Web Title: OnePlus Nord N200 5G Launched Specs Price Sale offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.