OnePlus Nord N200 लवकरच येईल बाजारात; स्पेसिफिकेशन्स, किंमत, डिजाइन आणि लाँचची तारीख आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 04:59 PM2021-06-08T16:59:47+5:302021-06-08T17:00:37+5:30
OnePlus Nord N200: OnePlus Nord N200 स्मार्टफोनची डिजाइन पण PCMag ने दाखवली आहे, या स्मार्टफोनमध्ये कॉर्नर पंच होल, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
OnePlus Nord N200 स्मार्टफोन लवकरच लाँच होऊ शकतो. भारतात OnePlus Nord CE 5G च्या लाँच केल्यानंतर कंपनी हा स्मार्टफोन लाँच करू शकते, अशी चर्चा आहे. Nord N200 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार नाही. वनप्लसचा हा स्मार्टफोन अमेरिकेत सादर केला जाईल. आता नवीन रिपोर्टमध्ये OnePlus Nord N200 च्या मुख्य स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. तर दुसऱ्या लीकमध्ये OnePlus Nord N200 ची लाँच डेट समजली आहे.
OnePlus Nord N200 ची किंमत
PCMag च्या रिपोर्टनुसार, वनप्लसचा हा स्मार्टफोन बजेट 5G स्मार्टफोन असेल जो अमेरिकेत 250 डॉलर (जवळपास 18,200 रुपये) मध्ये विकत घेता येईल.
OnePlus Nord N200 चे स्पेसिफिकेशन्स
OnePlus Nord N200 मध्ये 6.49 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. वनप्लसचे सीईओ पीट लाऊ यांनी PCMag ला दिलेल्या मुलाखतीती सांगितले कि प्रीमियम आणि अल्ट्रा प्रीमियम OnePlus 9 series नंतर OnePlus Nord N200 5G—आमचा नवीन आणि सर्वात किफायतशीर 5G डिवाइस असेल.
OnePlus Nord N200 स्मार्टफोनची डिजाइन पण PCMag ने दाखवली आहे, या स्मार्टफोनमध्ये कॉर्नर पंच होल, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या एक्सक्लूसिव रिपोर्टमध्ये OnePlus Nord N200 च्या लाँचबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु, टिपस्टर Mukul Sharma ने लाँचबद्दल सांगितले आहे कि, OnePlus Nord N200 स्मार्टफोन 15 जूनला लाँच होणार आहे.