OnePlus च्या हटके Foldable Phone वर काम सुरु; फोटोज आले समोर
By सिद्धेश जाधव | Published: November 25, 2021 03:26 PM2021-11-25T15:26:28+5:302021-11-25T15:32:10+5:30
Oneplus Foldable Phone: OnePlus लवकरच आपला Foldable Phone सादर करू शकते. हा फोन ट्रिपल फोल्ड डिस्प्लेसह बाजारात येईल.
Oneplus Foldable Phone: OnePlus लवकरच आपला Foldabale Phone सादर करू शकते. बीबीके इलेकट्रोनिक्सच्या ब्रँड्स मधील हा तिसरा ब्रँड आहे ज्याच्या फोल्डेबल फोनची बातमी आली आहे. याआधी ओप्पो रियलमी आपले फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे बीबीके ग्रुप या सेगमेंटमध्ये सॅमसंगला तगडे आव्हान देण्याची तयारी करत असलायचं दिसत आहे.
LetsGoDigital ने दिलेल्या माहितीनुसार, OnePlus च्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये तीन डिस्प्ले असतील. कंपनीनं या फोल्डेबल फोनचा पेटंट 2020 मध्ये चीनमध्ये फाईल केला होता, जो जुलै 2021 मध्ये पब्लिश झाला आहे. वनप्लसचा हा फोल्डेबल डिवाइस Gao Yang यांनी डिजाइन केला आहे, जो WIPO (वर्ल्ड इंटेलेक्च्युल प्रॉपर्टी ऑफिस) च्या डेटाबेसमध्ये आढळला आहे.
वनप्लसच्या या फोल्डेबल स्मार्टफोनच्या पेटंटवरून अनेक रेंडर्स समोर आले आहेत. हा स्मार्टफोन तीन पद्धतीनं फोल्ड करता येईल. फोल्ड झाल्यानंतर हा फोन एखाद्या घडी केलेल्या रुमालासारखा दिसतो. अनफोल्ड केल्यानंतर हा एका मोठ्या अँड्रॉइड टॅबलेटप्रमाणे वापरता येईल. व्यवस्थित फोल्ड करता यावा म्हणून कंपनी फ्रेममध मॅग्नेटसचा वापर करू शकते. ही डिजाइन आतापर्यंत आलेल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत हटके डिजाईनसह सादर केला जाईल. सध्या या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही, परंतु हा फोन हायएंड स्पेक्ससह बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.