यंदा दिसणार OnePlus चा रुद्रावतार! रेडमीपासून आयफोनपर्यंत सर्वांशी भिडणार

By सिद्धेश जाधव | Published: March 22, 2022 01:09 PM2022-03-22T13:09:14+5:302022-03-22T13:10:12+5:30

OnePlus यंदा अनेक स्मार्टफोन लाँच करणार आहे. यात स्वस्त स्मार्टफोन्सचा समावेश तर असेलच परंतु अल्ट्रा फ्लॅगशिप देखील कंपनी बाजारात सादर करू शकते.  

OnePlus Smartphone Launch Timeline Leak Online For 2022 See Full List  | यंदा दिसणार OnePlus चा रुद्रावतार! रेडमीपासून आयफोनपर्यंत सर्वांशी भिडणार

(प्रतीकात्मक फोटो)

Next

OnePlus नं स्मार्टफोन सेगमेंटमध्ये जेव्हा पदार्पण केलं तेव्हा कंपनी दरवर्षी काही निवडक स्मार्टफोन सादर करत होती. हे सर्व फोन्स फ्लॅगशिप स्मार्टफोन्सचा अनुभव कमी किंमतीत देत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून कंपनीचा नवा अवतार समोर आला आहे. कंपनीनं नवीन सीरिजसह नवीन बजेट सेगमेंटमध्ये एंट्री घेण्यास सुरुवात केली आहे. आता समोर आलेल्या बातमीनुसार, यंदा वनप्लस विविध सेगमेंटमध्ये 6 डिवाइस सादर करणार आहे. 

यावर्षी कंपनी अनेक डिवाइस लाँच करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आलेल्या टाइमलाईनमधून दिसली आहे. यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत एक-दोन नव्हे तर 6 वनप्लस फोन बाजारात येऊ शकतात. यात OnePlus 10 Pro, OnePlus Nord CE 2 Lite, OnePlus Nord 2T, OnePlus 10R, OnePlus Nord 3 आणि OnePlus 10 Ultra सारख्या स्मार्टफोनचा समावेश असेल.  

OnePlus 2022 Timeline  

टिप्सटर Yogesh Brar नुसार, या यादीतील OnePlus 10 Pro लवकरच भारतासह जागतिक बाजारात येऊ शकतो. त्यानंतर कंपनी OnePlus Nord CE 2 Lite एप्रिलमध्ये लाँच करू शकते. जो एक बजेट स्मार्टफोन असू शकतो. तर एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला OnePlus Nord 2T ची एंट्री होऊ शकते. त्यानंतर फ्लॅगशिप OnePlus 10R बाजारात येऊ शकतो.  

जुलैमध्ये OnePlus Nord 3 लाँच केला जाऊ शकतो, जो मिड रेंज स्मार्टफोन असू शकतो.या लिस्टमधील शेवटचा स्मार्टफोन OnePlus 10 Ultra असेल. जो OnePlus 10 Pro Plus नावानं देखील सादर केलं जाऊ षट्को. लीकनुसार, हा फोन सप्टेंबरमध्ये लाँच होईल. या फोनमध्ये आयफोनसारखा फ्लॅट डिस्प्ले आणि फ्लॅगशिप प्रोसेसर मिळू शकतो. 

Web Title: OnePlus Smartphone Launch Timeline Leak Online For 2022 See Full List 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.