शानदार क्लॅरिटी असलेल्या 4K डिस्प्लेसह आला OnePlus चा Smart TV; मिळतोय डॉल्बी ऑडिओ
By सिद्धेश जाधव | Published: April 7, 2022 05:14 PM2022-04-07T17:14:59+5:302022-04-07T17:15:14+5:30
OnePlus TV Y1S Pro स्मार्ट टीव्ही अखेरीस भारतात लाँच झाला आहे. यात HDR10 decoding डिस्प्ले आणि Dolby Audio मिळतो.
OnePlus भारतात आपला नवा Smart TV सादर करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानुसार आज OnePlus TV Y1S Pro स्मार्टटीव्ही देशात आला आहे. यात 4K डिस्प्ले. HDR10 Decoding, Dolby Audio आणि Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. चला जाणून घेऊया या टीव्हीची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
किंमत
OnePlus TV Y1S Pro ची किंमत 29,999 रुपये आहे. हा टीव्ही अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. कंपनीनं या टीव्हीवरील बँक ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 2,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
OnePlus TV Y1S Pro चे स्पेसीफिकेशन्स
OnePlus TV Y1S Pro मधील डिस्प्लेचा आकार 43 इंच आहे. हा एक 4K बेजल लेस पॅनल आहे. जो HDR10 decoding ला सपोर्ट करतो. या स्मार्टटीव्ही मध्ये MEMC, डायनॅमिक कॉन्ट्रास्ट सारखे फीचर्स मिळतात. तसेच चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसाठी यात गामा इंजिन देण्यात आला आहे. हा टीव्ही Android TV 11 वर आधारित OxygenOS वर चालतो.
या स्मार्ट टीव्हीमध्ये Google Play Store मधून कोणतेही अॅप्स डाउनलोड करता येतात. ज्यात Netflix, Prime Video, Disney+ Hotstar इत्यादी लोकप्रिय ओटीटी अॅप्सचा देखील समावेश आहे. गुगल क्रोम कास्टच्या मदतीनं तुमच्या मोबाईलवरील कंटेंट सहज टीव्हीवर बघता येईल. या टीव्हीमाहे 24W स्पिकर्स देण्यात आले आहेत, जे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.0, LAN पोर्ट, दोन HDMI 2.0 पोर्ट, एक AV input आणि दोन USB पोर्ट देण्यात आले आहेत.