Oneplus Smart TV: भारतात येतायत OnePlus चे 4 Smart TV; कमी किंमतीत देऊ शकतात शाओमीला टक्कर

By सिद्धेश जाधव | Published: February 3, 2022 05:25 PM2022-02-03T17:25:36+5:302022-02-03T17:25:52+5:30

OnePlus Smart TV: OnePlus लवकरच भारतात चार नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर करणार आहे. यातील दोन स्मार्ट टीव्ही फक्त ऑफलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होतील.

Oneplus Will Soon Launch 4 Smart TVs  | Oneplus Smart TV: भारतात येतायत OnePlus चे 4 Smart TV; कमी किंमतीत देऊ शकतात शाओमीला टक्कर

Oneplus Smart TV: भारतात येतायत OnePlus चे 4 Smart TV; कमी किंमतीत देऊ शकतात शाओमीला टक्कर

Next

OnePlus नं आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो खूप वाढवला आहे. स्मार्टफोन्ससह कंपनीनं ऑडिओ प्रोडक्ट्स आणि Smart TV सेगमेंटमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं भारतात OnePlus 9RT स्मार्टफोन सादर केला होता. लवकरच बजेट फ्रेंडली Nord CE 2 सीरीज देखील देशात देणार आहे. त्याचबरोबर कंपनी भारतात लवकरच OnePlus Y1S सीरीजचे नवीन स्मार्ट टीव्ही देखील लाँच करणार आहे.  

OnePlus लवकरच भारतात चार नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर करणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवनं दिली आहे. यातील दोन स्मार्ट टीव्ही फक्त ऑफलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होतील. तर अन्य दोन स्मार्ट टीव्ही मोडले ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होतील. लीकनुसार यातील दोन मॉडेल 17 फेब्रुवारीला ग्राहकांच्या भेटीला येतील.  

OnePlus Smart TV  

कंपनी 32-इंच आणि 42-इंचाचे स्मार्ट टीव्ही लाँच जाणार आहे. यातील दोन मॉडेल्स कंपनी Y1S सीरीज अंतर्गत सादर करू शकते. जे HDR10+, आणि Dolby Audio (Atmos decoding सह) सादर केले जाऊ शकतात. तसेच आगामी वनप्लस स्मार्ट टीव्हीमध्ये 20W स्पिकर दिले जाऊ शकतात. हे स्मार्ट टीव्ही Android TV 11.0 वर चालतील. ज्यात ड्युअल बँड वाय-फाय सपोर्ट मिळेल.  

हे देखील वाचा:

Web Title: Oneplus Will Soon Launch 4 Smart TVs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.