OnePlus, Xiaomi चे स्मार्टफोन वापरताय...सावध व्हा आणि हे वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 12:34 PM2019-02-12T12:34:42+5:302019-02-12T14:58:10+5:30
जगभरासह भारतात OnePlus, Xiaomi या कंपन्यांनी मोबाईल विक्रीमध्ये उच्चांक गाठला आहे. मात्र, याच कंपन्यांचे फोन तुमच्यासाठी अतिशय धोक्याचे आहेत. या कंपन्यांच्या फोनमधून निघणारे रेडिएशन सर्वांत जास्त आणि पातळी ओलांडणारे असल्याचे जर्मनीच्या फेडरल ऑफिस ऑफ रेडिएशन प्रोटेक्शनने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.
जगभरासह भारतात OnePlus, Xiaomi या कंपन्यांनी मोबाईल विक्रीमध्ये उच्चांक गाठला आहे. मात्र, याच कंपन्यांचे फोन तुमच्यासाठी अतिशय धोक्याचे आहेत. या कंपन्यांच्या फोनमधून निघणारे रेडिएशन सर्वांत जास्त आणि पातळी ओलांडणारे असल्याचे जर्मनीच्या फेडरल ऑफिस ऑफ रेडिएशन प्रोटेक्शनने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. या अभ्यासामध्ये 16 सर्वाधिक आणि सर्वात कमी रेडिएशन पसरविणारे फोनची लिस्ट जारी केली आहे. यानुसार शाओमीच्या ए1 आणि वनप्लस 5टी मध्ये सर्वाधिक रेडिएशन बाहेर पडत आहेत.
मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. या रेडिएशनला स्पेसिफिक अॅब्सॉर्पशन रेट (SAR) असे म्हटले जाते. हे प्रमाण किलोग्रॅम वॅटमध्ये मोजले जाते. भारतात या सीएसआरची मर्यादा 1.60 वॉट एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र, एमआय ए1 ची सीएसआर व्हॅल्यू 1.75 वॅट तर वनप्लस 5टी ची व्हॅल्यू 1.68 वॅट प्रती किलो आढळून आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही कंपन्यांचा केवळ एकच फोन यामध्ये नसून दोन-दोन फोन या यादीमध्ये प्रथम आहेत. या 16 फोनच्या यादीमध्ये एचटीसी, गुगल, अॅपल, झेडटीई आणि सोनी सारख्या ब्रँडचेही फोन आहेत. या यादीमध्ये पहिला एमआय ए1, दुसरा वनप्लस 5टी, तिसरा एमआय मॅक्स 3 आणि चौथा पुन्हा वनप्लसचा नुकताच लाँच झालेला 6टी हा फोन आहे. तर नवव्या क्रमांकावर अॅपलचा आयफोन 7 हा आहे ज्याची एसएआर व्हॅल्यू 1.38 आहे.
महत्वाचे म्हणजे काही वर्षांपूर्वी नोकियाला नेस्तनाभूत करून भारतीय बाजारपेठ काबीज करणाऱ्या सॅमसंगने सर्वात कमी रेडिएशनच्या यादीमध्ये बाजी मारली आहे. कमी रेडिएशन सोडणाऱ्या 16 फोनच्या यादीमध्ये सॅमसंगचे तब्बल 8 फोन आहेत. ज्यांची एसएआर व्हॅल्यू 0.17 वॅट प्रतिकिलोपासून आहे. पहिल्या क्रमांकावर सॅमसंगचा नोट 8 हा फोन आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर झेडटीईचा एक्सॉन इलाईट, तिसऱ्या क्रमांकावर एलजी जी 7, चौथ्या क्रमांकावर सॅमसंगचा गॅलेक्सी ए 8 आणि पाचव्या क्रमांकावर सॅमसंगचा एस 8 हा फोन आहे.
मोबाईलच्या रेडिएशनचे SAR प्रमाण कसे मोजाल? किती धोकादायक?