Elon Musk च्या Starlink ला 'ही' स्वदेशी कंपनी देणार टक्कर; दुर्गम भागात इंटरनेट देण्यासाठी ISRO करणार मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 06:39 PM2021-10-14T18:39:19+5:302021-10-14T18:39:44+5:30
2022 च्या मध्यापासून ISRO च्या मदतीने सॅटेलाईटच्या माध्यमातून देशात कनेक्टिविटी सेवा देण्याची योजना वनवेबची आहे.
Elon Musk यांची Starlink कंपनी कृत्रिम उपग्रहांचा वापर करून इंटरनेट देण्याचे काम करते. यामुळे दुर्गम भागातही इंटरनेट पोहोचवणे सोप्पे होते. ही कंपनी लवकरच भारतात देखील आपली सुविधा देण्यास सुरुवात करणार आहे. परंतु आता स्टारलिंकला स्वदेशी OneWeb कडून तगडे आव्हान मिळू शकते. वनवेब ही Bharti Airtel चे चेयरमन सुनील मित्तल यांची कंपनी आहे.
स्टारलिंक प्रमाणे वनवेब प्रमाणे सॅटेलाईट इंटरनेट सर्विस देण्याचे काम करते. सध्या ही सुविधा फक्त व्यवसायिक वापरासाठी उपलब्ध आहे. लवकरच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध केली जाऊ शकते. यासाठी वनवेबने ISRO सोबत भागेदारी केली आहे. 2022 च्या मध्यापासून वनवेब सॅटेलाईटच्या माध्यमातून देशात कनेक्टिविटी सेवा देण्याची योजना असल्याची माहिती मित्तल यांनी दिली आहे.
लाँच करणार नवीन सॅटेलाईट
भारतातून सॅटेलाईट लाँच करण्यासाठी वनवेब इसरोच्या जियोसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकल मार्क-3 रॉकेटचा वापर करेल. तसेच भारती ग्रुपमधील ही स्पेस कंपनी इसरोच्या स्वदेशी रॉकेट पीएसएलवी (PSLV) आणि जीएसएलवी (GSLV) मधून कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित करेल. उपग्रह लाँच करण्यासाठी इसरोच्या रॉकेट जीएसएलवी 3 चा देखील वापर करण्यात येईल. सध्या वनवेबचे 322 सॅटेलाईट अवकाशात आहेत.
विशेष म्हणजे वनवेब ही स्पेस रेसमध्ये उतरणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी आहे. वनवेबमध्ये गुंतवणूक करून भारती एयरटेलने या शर्यतीत सहभाग घेतला आहे. पुढील तीन ते पाच वर्षात स्पेस इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल होतील, असे मित्तल यांनी म्हटले आहे.