फेसबुक मॅसेंजर लाईटमध्ये व्हिडीओ चॅटिंगची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 01:07 PM2018-03-08T13:07:54+5:302018-03-08T13:07:54+5:30

विकसनशील देशांमध्ये इंटरनेटच्या संथ वेगाची अडचण असते.

Online chatting feature in Facebook light messenger | फेसबुक मॅसेंजर लाईटमध्ये व्हिडीओ चॅटिंगची सुविधा

फेसबुक मॅसेंजर लाईटमध्ये व्हिडीओ चॅटिंगची सुविधा

googlenewsNext

फेसबुक मॅसेंजरच्या लाईट आवृत्तीमध्ये व्हिडीओ चॅटिंगची सुविधा देण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
फेसबुक कंपनीने २०१५ साली आपल्या मॅसेंजरची लाईट आवृत्ती लाँच केली होती. विकसनशील देशांमध्ये इंटरनेटच्या संथ वेगाची अडचण असते. यातच या देशांमध्ये कमी रॅम आणि स्टोअरेजयुक्त अर्थात एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात वापरले जातात. यामुळे युजर्सला आकारमानाने मोठे आणि जास्त इंटरनेटचा वापर करणारे अ‍ॅप्स वापरतांना अडचण होते. नेमकी हीच बाब लक्षात घेत फेसबुक मॅसेंजर लाईट हे स्वतंत्र अ‍ॅप सादर करण्यात आले होते. याचा आकार १० मेगाबाईटच्या आत असून ते तुलनेत कमी वेग असणार्‍या इंटरनेटवरही सहजपणे चालते. प्रारंभी भारत व इंडोनेशियासह ३० राष्ट्रांमध्ये फेसबुक मॅसेंजर लाईट अ‍ॅप लाँच करण्यात आले होते. आता याची व्याप्ती वाढवत जगातील तब्बल १०० देशांमध्ये याला लाँच करण्यात आले आहे. याच अ‍ॅपवर आता व्हिडीओ चॅटींग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

फेसबुक मॅसेंजरच्या मुख्य अ‍ॅपमध्ये आधीच व्हिडीओ चॅटींगची सुविधा देण्यात आली असून ती युजर्सच्या पसंतीस उतरली आहे. या पार्श्‍वभूमीवर याच्या लाईट आवृत्तीचे युजर्सही व्हिडीओ चॅटिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत. या अ‍ॅपवर आधीच टेक्स्ट, प्रतिमा, स्टीकर्स आणि लिंक शेअर करण्याची सुविधा दिलेली आहे. यात आता व्हिडीओची भर पडणार आहे. 

Web Title: Online chatting feature in Facebook light messenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.