फक्त 5 दिवस! 1 जानेवारीपासून बदलणार हे 5 नियम, मोबाइल होईल डब्बा; आजच करून घ्या ही कामं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:50 AM2023-12-29T10:50:02+5:302023-12-29T10:52:32+5:30
5 rule change from 1 january 2024 including gmail mobile sim card upi id
आपण मोबाइल वापरत असाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण 1 जानेवारी 2024 पासून 5 मोठे बदल होत आहेत. याचा मोबाइल युजर्सवर थेट परिणाम होणार आहे. अशात आपल्याला 31 डिसेंबरपूर्वी काही महत्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला मोबाइल फोनच्या सहाय्याने यूपीआय पेमेंट करता येणार नाही. याशिवाय आपले सीमकार्डदेखील ब्लॉक होऊ शकते. अर्थात एकप्रकारे आपला फोन डब्ब होईल.
...तर यूपीआय पेमेंट करता येणार नाही -
जर आपण यूपीआय आयडी एक वर्ष अथवा त्याहून अधिक काळापासून वापरला नसेल तर, आपला यूपीआय आयडी 31 डिसेंबरनंतर बंद करण्यात येणार आहे. अर्थात एक जानेवारी 2023 पासून आपण यूपीआय पेमेंट, जसे गूगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरू शकणार नाहीत.
सिम कार्डचा नवा नियम -
नव्या वर्षापासून सिम कार्ड घेणे अवघड होणार आहे. कारण सरकार नवे नियम लागू करत आहे. यानुसार नवे सीम कार्ड घेण्यासाठी बॉयोमेट्रिक डिटेल द्यावी लागेल. यासंदर्भातील विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. यानंतर, या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल
हे जीमेल अकाउंट बंद होणार -
गेल्या एक अथवा दोन वर्षांपासून ज्या जीमेल अकाउंटचा वापर करण्यात आलेला नाही. गुगल अशी सर्व अकाउंट्स बंद करणार आहे. हा नवा नियम पर्सनल जीमेल अकाउंट्स साठीच लागू असेल. अर्थात नवा नियम शाळा आणि उद्योगांसाठीच्या अकाउंटसाठी लागू नसेल. अर्थात आपण आपेल जीमेल अकाउंट अॅक्टिव्ह ठेवायला हवे.
लॉकर अॅग्रीमेंट -
रिझर्व्ह बँकेने 31 डिसेंबर 2023 पर्यंत लॉकर अॅग्रीमेंटचे नूतनीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नव्या वर्षापासून नवीन लॉकर नियम लागू केला जाणार आहे. अशात आपल्याला 31 डिसेंबरपर्यंत मंजुरी द्यावी लागणार आहे. अन्यथा आपल्याला लॉकर वापरता येणार नाही.
नॉमिनी अपडेट -
डीमॅट अकाउंट होल्डरला 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनीची माहिती अपडेट करावी लागणार नाही. यापूर्वी याची डेडलाइन 30 सप्टेंबर होती. मात्र ती तीन महिन्यांनी वाढून 31 डिसेंबर करण्यात आली आहे.