युजर्सची फक्त थोडीशी माहिती बघतो : व्हॉटसअ‍ॅपचा दावा

By शेखर पाटील | Published: April 13, 2018 03:12 PM2018-04-13T15:12:49+5:302018-04-13T15:12:49+5:30

फेसबुकच्या पाठोपाठ व्हॉटसअ‍ॅपच्या सुरक्षेबाबत संशयकल्लोळ सुरू असतांना आपण युजर्सची फक्त थोडीशी माहिती बघत असल्याचा दावा या मॅसेंजरतर्फे करण्यात आला आहे.

Only a little bit of information about users: Whatsap claims | युजर्सची फक्त थोडीशी माहिती बघतो : व्हॉटसअ‍ॅपचा दावा

युजर्सची फक्त थोडीशी माहिती बघतो : व्हॉटसअ‍ॅपचा दावा

googlenewsNext

फेसबुकच्या पाठोपाठ व्हॉटसअ‍ॅपच्या सुरक्षेबाबत संशयकल्लोळ सुरू असतांना आपण युजर्सची फक्त थोडीशी माहिती बघत असल्याचा दावा या मॅसेंजरतर्फे करण्यात आला आहे.

युजर्सच्या गोपनीय माहितीला थर्ड पार्टीजकडे सुलभपणे सोपविण्यामुळे फेसबुक वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. यावरून स्पष्टकरण देतांना मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या सहकार्‍यांची उडणारी फे-फे आपण सर्व जण पाहत आहोत. यातच, विवेक वधवा या तंत्रज्ञाने व्हॉटसअ‍ॅपवरही गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या मते व्हाटसअ‍ॅपवरील चॅटींग आणि ग्रुपमधील संभाषण हे एंड-टू-एंड एनक्रीप्शनच्या माध्यमातून अतिशय सुरक्षित असते यात दुमत नाही. तथापि, युजर्सच्या कॉल लॉगबध्दची सांगोपांग माहिती (मेटाडाटा) ही व्हाटसअ‍ॅपकडे जमा होत असून याचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा विवेक वधवा यांनी अलीकडेच केल्यामुळे खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमिवर, व्हाटसअ‍ॅपच्या प्रवक्त्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत.

व्हॉटसअ‍ॅपच्या भारतीय शाखेच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार आमच्या मॅसेंजरवरील सर्व संभाषण हे पुर्णपणे सुरक्षित असून या माहितीचा आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा संग्रह होत नाही. याच प्रकारे युजरच्या कॉल लॉगचा मेटाडाटादेखील सुरक्षित असल्याचा दावा या प्रवक्त्याने केला. तथापि, आमची कंपनी युजर्सचा थोडा फार डाटा बघत असल्याची कबुलीदेखील त्यांनी दिली. आता थोडा फार या संज्ञेच्या अंतर्गत येणारा डाटा नेमका कोणता? याची विचारणा करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रवक्त्याने व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमीनने ग्रुप इनव्हाईट लिंकच्या माध्यमातून ग्रुपमध्ये जॉईन होणार्‍या सदस्यांबाबत काळजी घेण्याचे आवाहनदेखील केले आहे.

व्हॉटसअ‍ॅपने काही महिन्यांपूर्वी आपल्या युजर्सची माहिती फेसबुककडे सोपविण्याचा घेतलेला निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. खरं तर फेसबुकने आपल्या सोशल साईटला इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअ‍ॅपशी इंटर-कनेक्ट करण्याचा निर्णय बर्‍याच आधी जाहीर केला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामला एकमेकांशी जोडण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली आहे. मात्र फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅप यांना कनेक्ट करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरू शकतो. यातच आता युजर्सची अल्प माहिती पाहत असल्याची कबुली दिल्यामुळे व्हॉटसअ‍ॅपबाबत पुन्हा एकदा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

Web Title: Only a little bit of information about users: Whatsap claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.