स्मार्टफोन ग्राहकांसाठी वाईट बातमी; शाओमीनंतर ओप्पोने वाढवल्या बजेट स्मार्टफोन्सच्या किंमती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:09 PM2021-07-02T17:09:25+5:302021-07-02T17:13:12+5:30
Oppo ने आपल्या काही बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्सच्या किंमतीत 1,000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे.
शाओमी पाठोपाठ Oppo ने भारतात आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने आपल्या बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्सच्या किंमतीती 1,000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. हे स्मार्टफोन्स नवीन वाढलेल्या किंमतींसह कंपनीच्या वेबसाईट आणि अमेझॉन व फ्लिपकार्ट या ईकॉमर्स साईट्सवर लिस्ट झाले आहेत. चला जाणून घेऊया कि कुठल्या ओप्पो स्मार्टफोन्सची किंमत किती वाढली आहे. (Oppo F19, Oppo A53s, More Oppo Smartphones’ Prices Increased by Up to Rs. 1,000 in India)
OPPO च्या स्मार्टफोन्सच्या नवीन किंमती
ओप्पोने A11k ची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे 8,490 रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टफोन आता 8,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8,990 रुपयांमध्ये मिळणारा Oppo A15 स्मार्टफोनचा 2GB रॅम व्हेरिएंट 500 रुपयांच्या दरवाढीनंतर 9,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच या फोनच्या 3GB रॅम व्हेरिएंटची किंमत 10,490 रुपये झाली आहे.
Oppo A15s च्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,490 ऐवजी 1000 रुपयांनी वाढवून 12,490 रुपये करण्यात आली आहे. तसेच Oppo A53s स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1000 रुपये वाढवण्यात आली आहे. 16,990 रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टफोन आता 17,990 रुपयांमध्ये मिळत आहे. लोकप्रिय Oppo F19 च्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल आता 18,990 रुपयांमध्ये मिळत आहे, याआधी याची किंमत 17,990 रुपये होती.