लवकरच लाँच होऊ शकतो स्वस्त OPPO A37 2021; समोर आली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:37 PM2021-07-03T18:37:47+5:302021-07-03T18:38:32+5:30
OPPO A37 2021: OPPO A37 (2021) आणि OPPO A16 एकच असून दोन वेगवेगळ्या मार्केट्समध्ये हा वेगवेगळ्या नावांखाली लाँच केला जाऊ शकतो.
कालच बातमी आली होती OPPO ने 1 जुलैपासून भारतातील 5 स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. या फोन्समध्ये ओप्पोच्या ए सीरिजचे चार आणि एफ सीरिजमधील एका स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला होता. आता ओपोच्या ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनची माहिती येत आहे. कंपनी लवकरच OPPO A37 (2021) बाजारात सादर करू शकते. त्याचबरोबर कंपनी OPPO A16 वर देखील काम करत असल्याची माहिती समोर आली आहे आणि हे दोन्ही स्मार्टफोन एकच असू शकतात.
अलीकडेच OPPO A16 चा एक फोटो इंटरनेटवर लीक झाला होता. लीकमध्ये सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात येईल. आता OPPO A37 (2021) ची माहिती समोर आली आहे जो कंपनीच्या होम मार्केट म्हणजे चीनमध्ये लाँच केला जाईल. विशेष म्हणजे OPPO A37 (2021) आणि OPPO A16 एकच असून दोन वेगवेगळ्या मार्केट्समध्ये हा वेगवेगळ्या नावांखाली लाँच केला जाऊ शकतो.
OPPO A37 (2021) चे स्पेसिफिकेशन्स
मागे OPPO A16 सर्टिफिकेशन साईट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला होता. तिथे हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह दाखवण्यात आला होता. या फोनच्या मदरबोर्ड सेक्शनमध्ये 6765 लिहिण्यात आले होते. 6765 हा मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेटचे कोडनेम आहे. तसेच या फोनमध्ये 2.30गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम असल्याची माहिती गीकबेंचवर देण्यात आली होती. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते जी 10W फास्ट चार्जिंगने चार्ज करता येईल. सध्यातरी OPPO A16 किंवा OPPO A37 (2021) दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे समोर येण्याची वाट बघावी लागेल.