10 हजारांच्या आत Oppo च्या स्मार्टफोनची एंट्री; मोठ्या डिस्प्लेला मोठ्या बॅटरीची जोड
By सिद्धेश जाधव | Published: March 21, 2022 03:04 PM2022-03-21T15:04:43+5:302022-03-22T11:12:46+5:30
OPPO A16e स्मार्टफोनमध्ये 4GB RAM, 4230mAh ची बॅटरी आणि 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत.
Oppo नं भारतात आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. या डिवाइसची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. त्यामुळे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांसाठी एंट्री लेव्हल स्मार्टफोन Oppo A16e एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनीनं या फोनचे दोन व्हेरिएंट सादर केले आहेत. चला जाणून घेऊया OPPO A16e स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स.
Oppo A16e चे स्पेसिफिकेशन्स
Oppo A16e स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा Helio P22 प्रोसेसर आहे. सोबत ग्राफिक्ससाठी PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. यात 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत स्टोरेज मिळते. जी डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येईल.
या ओप्पो स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4230mAh ची बॅटरी मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात फेस अनलॉकची सुविधा मिळते.
OPPO A16e ची किंमत
OPPO A16e स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनची किंमतीची माहिती दिली नाही. रिपोर्टनुसार, Oppo A16e स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स भारतात येऊ शकतात. यातील बेस व्हेरिएंटमध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळू शकते, तर मोठा व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला जाईल. या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 9,990 रुपये ठेवली जाऊ शकते. तर मोठा व्हेरिएंट 11,990 रुपयांमध्ये भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.