Oppo Smartphone: ओप्पोनं केली कमाल! बजेट फ्रेंडली OPPO A16K भारतात लाँच; फीचर्सही आहेत अफलातून
By सिद्धेश जाधव | Published: January 12, 2022 03:24 PM2022-01-12T15:24:26+5:302022-01-12T15:26:18+5:30
Oppo Smartphone: Oppo A16K स्मार्टफोन देशात 3GB RAM, MediaTek Helio G35 chipset, 13MP camera आणि 4230mAh बॅटरी अशा भन्नाट स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे.
OPPO नं आज भारतीय बाजारात आपला एक लो बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Oppo A16K स्मार्टफोन देशात 3GB RAM, MediaTek Helio G35 chipset, 13MP camera आणि 4230mAh बॅटरी अशा भन्नाट स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
OPPO A16K चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A16K हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाइन आणि सिंगल रियर कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. यात 6.52 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. 88.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह येणारा हा फोन 480 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
या स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Helio G35 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 3GB RAM आणि 32GB ची स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा मोबाईल Android 11 आधारित ColorOS 11.1 Lite वर चालतो.
OPPO A16K च्या बॅक पॅनलवर एकच 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4,230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर कनेक्टिविटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.0, हेडफोन जॅक आणि USB Type C पोर्ट असे पर्याय मिळतात. या नवीन ओप्पो मोबाईल को 10,490 रुपयांमध्ये Black, White आणि Blue कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर