स्वस्त OPPO A16K स्मार्टफोनची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक; मीडियाटेकच्या चिपसेटसह येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: October 29, 2021 11:58 AM2021-10-29T11:58:38+5:302021-10-29T11:59:36+5:30

Upcoming Phone Under 10000 Oppo A16K: स्पेसिफिकेशन्सवरून OPPO A16K स्मार्टफोन कंपनी बजेट सेगमेंट सादर करू शकते, असा अंदाज लावला जात आहे. हा फोन भारतात 10000 रुपयांच्या असपास सादर केला जाऊ शकतो.  

Oppo a16k smartphone design and specifications leaked  | स्वस्त OPPO A16K स्मार्टफोनची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक; मीडियाटेकच्या चिपसेटसह येणार बाजारात 

स्वस्त OPPO A16K स्मार्टफोनची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक; मीडियाटेकच्या चिपसेटसह येणार बाजारात 

Next

ओप्पो सध्या एका नवीन बजेट स्मार्टफोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन OPPO A16 चा अपग्रेड व्हर्जन असेल आणि हा फोन OPPO A16K नावाने बाजारात येईल. आता 91mobiles ने आगामी OPPO A16K स्मार्टफोनचे रेंडर आणि काही स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक केली आहे. या रेंडर्समधून फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. चला जाणून घेऊया या आगामी फोनचे स्वरूप कसे असेल.  

OPPO A16K ची डिजाइन 

समोर आलेल्या रेंडर्सनुसार OPPO A16K स्मार्टफोन पॉलीकार्बोनेटपासून बनलेला असेल. फोनच्या बॅकपॅनलवर एलईडी फ्लॅशसह सिंगल रियर कॅमेरा आहे. फोनच्या उजव्या पॅनलवर व्हॉल्यूम की आणि पॉवर बटन मिळेल. फोनचा आकार 164 X 75.4 X 7.85mm आणि वजन 175 ग्राम आहे. रेंडर्सनुसार हा ओप्पो स्मार्टफोन ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक अशा तीन कलर ऑप्शन्ससह उपलब्थ होईल. याव्यतिरिक्त या फोनच्या डिजाईनची कोणतीही माहिती समोर आली नाही. विशेष म्हणजे या फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिसत नाही.  

OPPO A16K चे लीक स्पेसिफिकेशन्स 

OPPO A16K स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ओप्पो या फोनमध्ये 4230mAh ची बॅटरी आणि 10W स्टँडर्ड चार्जिंग स्पीड मिळेल. या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. तर 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी कंपनी MediaTek Helio G35 SoC चा वापर करू शकते. हा फोन 3GB RAM + 32GB आणि 4GB RAM + 64GB व्हेरिएंटसह बाजारात येईल. हा मोबाईल Android 11 वर आधारित ColorOS 11.1 वर चालेल. 

वरील स्पेसिफिकेशन्सवरून OPPO A16K स्मार्टफोन कंपनी बजेट सेगमेंट सादर करू शकते, असा अंदाज लावला जात आहे. हा फोन भारतात 10000 रुपयांच्या असपास सादर केला जाऊ शकतो.  

Web Title: Oppo a16k smartphone design and specifications leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.