पुढील महिन्यात Oppo चा स्वस्त आणि शानदार स्मार्टफोन मीडियाटेकच्या वेगवान प्रोसेसरसह येणार भारतात
By सिद्धेश जाधव | Published: December 30, 2021 12:47 PM2021-12-30T12:47:14+5:302021-12-30T15:11:17+5:30
Oppo A16K स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4230mAh ची बॅटरी, 13MP रियर कॅमेरा आणि 3GB RAM देण्यात येईल.
Oppo A16K स्मार्टफोन जानेवारीमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. कंपनी हा डिवाइस जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात लाँच करू शकते. कंपनीनं या फोनच्या देशातील लाँचची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु टिपस्टरनुसार, Oppo A16K स्मार्टफोनमध्ये MediaTek प्रोसेसर मिळू शकतो. तसेच यात 3GB RAM देण्यात येईल.
Oppo A16K ची संभाव्य किंमत
ओप्पोनं नोव्हेंबरमध्ये हा फोन फिलिपीन्समध्ये लाँच केला होता. तिथे या डिवाइसची किंमत 6,999 PHP ठेवण्यात आली होती. ही किंमत जवळपास 10,350 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. भारतीय बाजारात देखील हा फोन या किंमतीच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.
OPPO A16K चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A16K आणि OPPO A16 च्या लूक आणि डिजाईनमध्ये जास्त फरक दिसत नाही. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाइन आणि सिंगल रियर कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. यात 6.52 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले मिळतो, ज्याचे रिजोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. 88.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह येणारा हा फोन 480 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल.
या स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Helio G35 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 3GB RAM आणि 32GB ची स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. हा मोबाईल Android 11 आधारित ColorOS 11.1 Lite वर चालतो.
OPPO A16K च्या बॅक पॅनलवर एकच 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनमध्ये 4,230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर कनेक्टिविटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.0, हेडफोन जॅक आणि USB Type C पोर्ट असे पर्याय मिळतात.
हे देखील वाचा:
Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे
फक्त 7,499 रुपयांमध्ये आला 5000mAh Battery असलेला शानदार स्मार्टफोन; Redmi ला टाकणार मागे?