5,000mAh बॅटरीसह OPPO A16s लाँच; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: August 16, 2021 02:58 PM2021-08-16T14:58:18+5:302021-08-16T16:38:02+5:30
OPPO A16s launch: ओपोने हा नवीन स्मार्टफोन नेदरलँडमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला गेला आहे.
गेल्या महिन्यात इंडोनेशियात लाँच करण्यात आलेल्या OPPO A16 स्मार्टफोनचा नवीन व्हर्जन आता जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. ओप्पोने ए सीरिजमध्ये OPPO A16s स्मार्टफोन नेदरलँडमध्ये सादर केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेकचा Helio G35 चिपसेट देण्यात आला असून हा स्मार्टफोन 5000mAh च्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो.
OPPO A16s चे स्पेसिफिकेशन्स
ओपो ए16एस स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.52 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध स्टॅंडर्ड रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेट आणि पावरव्हीआर जीपीयू देण्यात आला आहे. हा ओप्पो फोन अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालतो. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा: पावरफुल Honor Magic 3 सीरिज लाँच; फ्लॅगशिप प्रोसेसरसह तीन स्मार्टफोन सादर
OPPO A16s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी ओपो ए16एस मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
OPPO A16s ची किंमत
ओपोने हा नवीन स्मार्टफोन नेदरलँडमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत 149 Euros ठेवण्यात आली आहे. ही किंमत 13,000 भारतीय रुपयांच्या आसपास आहे. हा फोन भारतात कधी सादर केला जाईल, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
हे देखील वाचा: बॅगेत टाकून कुठेही नेता येणार हा इंडक्शन कुकर; आकाराने प्लेटपेक्षाही स्लिम