50MP कॅमेरा आणि 6GB रॅमसह Oppo चा नवा स्मार्टफोन; जाणून घ्या, किंमत आणि बरंच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:26 PM2024-08-20T12:26:15+5:302024-08-20T12:26:54+5:30
Oppo ने नुकताच भारतीय बाजारात नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 6 GB रॅमसोबत या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने नुकताच भारतीय बाजारात नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 6 GB रॅमसोबत या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. Oppo A3 5G हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन म्हणून बाजारात लॉन्च करण्यात आला आहे. लोकांना या फोनचं डिझाईन खूप आवडू शकतं.
Oppo च्या या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच LCD स्क्रीन देण्यात आली आहे. हा डिस्प्ले 120 Hz चा रिफ्रेश रेट देतो. याशिवाय स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimension 6300 Soc चिपसेट प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali-G57 GPU आहे.
एवढेच नाही तर फोनमध्ये 6 GB LPDDR4X रॅम सोबत 6 GB रॅम विस्तार आणि 128 GB eMMC 5.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील देण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने फोनचे स्टोरेज आणखी वाढवता येते.
Introducing the new OPPO A3 5G!
— OPPO India (@OPPOIndia) August 19, 2024
Tough, bright and fast. With military-grade protection, a stunning 120Hz display, and lightning-fast charging, OPPO A3 5G is built to last.
Grab yours now: https://t.co/mHBvdzz6x6pic.twitter.com/t1BzAbmUxl
हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Color OS 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा सोबत 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.
Oppo चा हा लेटेस्ट स्मार्टफोन 5,100mAh बॅटरीसह लॉन्च करण्यात आला आहे. ही बॅटरी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते. याशिवाय साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक ड्युअल-सिम, 5G, वाय-फाय यूएसबी टाइप सी सारखे फीचर्स स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत.
कंपनीने Oppo A3 5G च्या 6GB + 128GB सिंगल व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. याशिवाय, कंपनी OneCard, बँक ऑफ बडोदा आणि SBI बँक कार्ड व्यवहारांद्वारे खरेदीवर ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट सूट देत आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ओशन ब्लू आणि नेब्युला रेड अशा दोन रंगांमध्ये आणला आहे.