ओपोचा धमाकेदार स्मार्टफोन होणार भारतात सादर; जाणून घ्या OPPO A55 4G चे स्पेसिफिकेशन्स  

By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 12:40 PM2021-09-22T12:40:47+5:302021-09-22T12:41:09+5:30

Oppo A55 Price In India: Oppo A55 4G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो.

OPPO A55 4G render design 50mp triple camera punch hole display india launch  | ओपोचा धमाकेदार स्मार्टफोन होणार भारतात सादर; जाणून घ्या OPPO A55 4G चे स्पेसिफिकेशन्स  

सौजन्य: 91mobiles

googlenewsNext
ठळक मुद्देOppo A55 4G स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो.

गेल्या आठवड्यात बातमी आली होती कि OPPO भारतात आपला नवीन स्मार्टफोन OPPO A55 लाँच करणार आहे. तेव्हा कंपनी चीनमध्ये सादर झालेला A55 5G देशात सादर करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु आता 91मोबाईल्सने या फोनच्या भारतीय लाँचची वेगळीच माहिती समोर ठेवली आहे. वेबसाईटनुसार नवीन लूक आणि डिजाईनसह कंपनी OPPO A55 4G भारतात सादर करू शकते.  

रिपोर्टमध्ये OPPO A55 4G ची रेंडर इमेज देखील शेयर करण्यात आली आहे. या इमेजनुसार हा फोन पंच-होल डिस्प्ले डिजाईन सादर केला जाईल. ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात असेल. बेजल लेस डिजाईनसह येणाऱ्या या फोनच्या खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिसेल. फोनच्या उजव्या पॅनलवर पॉवर बटन देण्यात येईल ज्यात फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड असेल, तर डाव्या पॅनलवर वाल्यूम रॉकर मिळेल.  

OPPO A55 4G फोनच्या बॅक पॅनलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे, ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या सेटअपमध्ये तीन कॅमेरा सेन्सर एका रांगेत देण्यात आले आहेत आणि त्याच्या उजवीकडे एलईडी फ्लॅश आहे. या कॅमेरा सेटअपमधील मुख्य कॅमेरा 50MP चा असेल. तसेच या फोनचे ब्लॅक, ग्रीन आणि ग्रेडियंट ब्लु असे तीन कलर व्हेरिएंट बाजारात येतील. या व्यतिरिक्त या फोनचे स्पेसीफाकेशन्स कसे असतील याची माहिती मात्र अजूनतरी मिळाली नाही.  

चीनमध्ये सादर झालेला OPPO A55 5G   

OPPO A55 5G मध्ये मीडियाटेकच्या 5G सपोर्टेड प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेटवर चालतो. यात 720 × 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. OPPO A55 5G फोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 आहे. चीनमध्ये फोन 6 जीबी रॅम आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध झाला आहे.   

OPPO A55 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा मुख्य रियर सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी फोनमधील 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याची मदत घेता येईल. पावर बॅकअपसाठी OPPO A55 5G मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.   

Web Title: OPPO A55 4G render design 50mp triple camera punch hole display india launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.