50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह शानदार Oppo A55 आला बाजारात; आजपासून प्री-बुकिंग सुरु 

By सिद्धेश जाधव | Published: October 1, 2021 02:53 PM2021-10-01T14:53:10+5:302021-10-01T14:56:56+5:30

Latest Budget Phone Oppo A55 Price In India:

Oppo a55 launched in india with 50mp camera know price and specifications  | 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह शानदार Oppo A55 आला बाजारात; आजपासून प्री-बुकिंग सुरु 

50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह शानदार Oppo A55 आला बाजारात; आजपासून प्री-बुकिंग सुरु 

Next

ओप्पोने आपल्या ‘ए’ सीरिज अंतर्गत OPPO A55 स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा कॅमेरा, मीडियाटेकचा Helio G35 चिपसेट, 6GB RAM आणि 18W फास्ट चार्जिंग असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. हा फोन दोन रॅम, स्टोरेज आणि कलर व्हेरिएंट्ससह बाजारात आला आहे.  

OPPO A55 ची किंमत 

  • 4GB RAM + 64GB: 15,490 रुपये 
  • 6GB RAM + 128GB: 17,490 रुपये 

OPPO A55 ची प्री-बुकिंग आजपासून ओप्पो इंडियाच्या वेबसाईटवर सुरु करण्यात आली आहे. तसेच हा फोन अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमधून विकत येईल. 

OPPO A55 चे स्पेसिफिकेशन्स 

OPPO A55 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 x 1,600 पिक्सल रिजोल्यूशन, 550 नीट्स ब्राईटनेस, 60Hz रिफ्रेश आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह सादर करण्यात आला आहे. OPPO A55 मध्ये कंपनीने मीडियाटेकचा Helio G35 चिपसेट दिला आहे. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन Android 11 आधारित ColorOS 11.1 वर चालतो. 

सिक्योरिटीसाठी AI फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, USB Type C आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय मिळतात. Oppo A55 स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. बॅक पॅनलवर 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलची मोनो कॅमेरा लेन्स असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या फोनमधील 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Oppo a55 launched in india with 50mp camera know price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.