लाँच होण्याआधीच OPPO A55 स्मार्टफोन Amazon वर लिस्ट; 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येऊ शकतो भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 04:58 PM2021-09-29T16:58:19+5:302021-09-29T16:58:26+5:30
Budget Phone OPPO A55 4G Price In India: 1 ऑक्टोबरला OPPO A55 नावाने सादर केला जाईल. परंतु लाँचपूर्वीच अॅमेझॉनवर लिस्ट झाल्यामुळे या फोनच्या काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
ओप्पोने गेल्या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन Oppo F19s सादर केला होता. आता कंपनी आपल्या A-सीरिजमधील नवीन स्मार्टफोनच्या लाँचची तयारी करत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन 1 ऑक्टोबरला OPPO A55 नावाने सादर केला जाईल. परंतु लाँचपूर्वीच अॅमेझॉनवर लिस्ट झाल्यामुळे या फोनच्या काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.
OPPO A55 चे स्पेसिफिकेशन्स
काही दिवसांपूर्वी OPPO A55 4G ची रेंडर इमेज देखील शेयर करण्यात आली होती. या इमेजनुसार हा फोन पंच-होल डिस्प्ले डिजाईन सादर केला जाईल. ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात असेल. बेजल लेस डिजाईनसह येणाऱ्या या फोनच्या खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिसेल. फोनच्या उजव्या पॅनलवर पॉवर बटन देण्यात येईल ज्यात फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड असेल, तर डाव्या पॅनलवर वाल्यूम रॉकर मिळेल.
OPPO A55 स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पंच होल डिजाईनसह येणारा हा फोन आय कंफर्ट मोडसह सादर केला जाईल. फोनमध्ये IPX4 वॉटर रेजिस्टन्स दिले जाऊ शकते. सिक्योरिटीसाठी या फोनच्या पॉवर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात येईल.
OPPO A55 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 2MP बोकेह सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन स्टारी ब्लॅक आणि रेनबो ब्लू रंगात सादर केला जाईल. पावर बॅकअपसाठी OPPO A55 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.