सर्वात स्वस्त आणि दमदार 5G स्मार्टफोन OPPO नं लाँच केला; फोनमध्ये 8GB RAM ची ताकद
By सिद्धेश जाधव | Published: April 18, 2022 03:59 PM2022-04-18T15:59:27+5:302022-04-18T15:59:51+5:30
Oppo नं आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
Oppo नं आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला आहे. कंपनीनं हा फोन आपल्या लोकप्रिय ए सीरिजमध्ये Oppo A55s 5G नावानं लाँच केला आहे. यात 8GB रॅम, 5000mAh ची दमदार बॅटरी आणि 13MP चा शानदार कॅमेरा आहे. चला जाणून घेऊया Oppo A55s 5G ची किंमत आणि फीचर्स.
Oppo A55s चे स्पेसिफिकेशन्स
Oppo A55s 5G मध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टियरड्रॉप नॉच डिस्प्ले 720 x 160 पिक्सलसह एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 700 चिपसेटचा वापर केला आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. डिवाइस Android 11 आधारित ColorOS 11.1 वर चालतो.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Oppo A55s 5G मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर हँडसेटच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. Oppo A55s मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Oppo A55s ची किंमत
Oppo A55s चे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. यातील 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 1,099 युआन (सुमारे 13,100 रुपये) आहे. तर फोनचा टॉप एन्ड व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह आला आहे. ज्याची किंमत 1,199 युआन (सुमारे 14,300 रुपये) आहे. हा फोन ब्रिस्क ब्लू, रिदम ब्लॅक आणि टेम्परामेंट गोल्ड रंगात विकत घेता येईल. सध्या चीनमध्ये आलेला हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.