शानदार OPPO A55s 5G Phone लाँचच्या उंबरठ्यावर; फोनमध्ये क्वॉलकॉमचा प्रोसेसर आणि 4000mAh ची बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: November 11, 2021 05:49 PM2021-11-11T17:49:51+5:302021-11-11T17:49:57+5:30
Oppo A55s 5G Phone Launch and Details: Oppo A55s स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात आलेल्या Oppo A55 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल.
ओप्पो आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनवर काम करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. तसेच लवकरच ओप्पोचा टॅबलेट देखील बाजारात येणार आहे. परंतु आता बातमी आली आहे कि, ओप्पो आपल्या ‘ए’ सीरीज अंतगर्त एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. हा स्मार्टफोन Oppo A55s नावाने बाजारात येईल. जो गेल्या महिन्यात भारतात आलेल्या Oppo A55 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल.
विविध लिक्स आणि रिपोर्ट्समधून Oppo A55s च्या लुक, डिजाईन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हा मोबाईल फोन पंच होल डिजाईनसह बाजारात येईल. तसेच हा एक मिडबजेट स्मार्टफोन असेल.
OPPO A55s चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो ए55एस स्मार्टफोन 5जी कनेक्टिविटीसह सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती लिक्समधून मिळाली आहे. तसेच हे फोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालेल. प्रोसेसिंगसाठी यात 2.04गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टकोर प्रोसेसर मिळेल, सोबत क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन चिपसेट असू शकतो. या फोनमध्ये 4GB RAM मिळू शकतो, तसेच अन्य व्हेरिएंट देखील बाजारात येतील.
Oppo A55s मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येईल. बेंचमार्किग साईटवर ओप्पो ए55एस स्मार्टफोनला सिंगल-कोर टेस्टमध्ये 510 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1592 स्कोर मिळाला आहे. हा फोन कधी बाजारात येईल हे मात्र अचूक सांगता येणार नाही.