5G फोन्सच्या यादीत 4G फोन उगवला; OPPO A57 4G भारतात 5000mAh च्या दमदार बॅटरीसह लाँच
By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2022 10:22 AM2022-06-21T10:22:24+5:302022-06-21T10:22:36+5:30
OPPO A57 4G बजेट स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि एक्सटेंडेड RAM सारख्या फीचर्ससह आला आहे.
OPPO A57 4G भारतीय बाजारात लाँच झाला आहे. अन्य 5G फोन्सचा वर्षाव होत असताना कंपनीनं हा खिशाला परवडणारा 4G हँडसेट सादर केला आहे. यात 4GB RAM, 13MP कॅमेरा, 5,000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात थायलंडमध्ये सादर करण्यात आला होता.
OPPO A57 4G चे स्पेसिफिकेशन्स
OPPO A57 4G (2022) स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या वॉटरड्रॉप नॉच असलेल्या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1612 x 720 पिक्सल आहे. बजेट स्मार्टफोन MediaTek Helio G35 ऑक्टाकोर प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 4GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 64GB ची इंटरनल मेमरी आहे, जी मायक्रोएसडी कार्डनं 1TB पर्यंत वाढवता येते. तसेच एक्सटेंडेड RAM फीचर फोनचा RAM 4GB नं वाढवू शकतो.
OPPO A57 4G च्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 13MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा मिळतो. या बजेट स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, तसेच AI फेस अनलॉक फीचर देखील मिळते. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग फीचर मिळतं.
किंमत
OPPO A57 4G स्मार्टफोन 3GB RAM व 64GB आणि 4GB RAM व 64GB अशा दोन व्हेरिएंटसह भारतात लाँच करण्यात आला आहे. साध्य फोनचा मोठा मॉडेल 13,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग ग्रीन रंगात विकत घेता येईल. याची खरेदी कंपनीच्या वेबसाईटसह ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवरून करता येईल. Bank of Baroda च्या कार्ड धारकांना 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.