किंमत आहे किफायतशीर, 5G प्रोसेसरसह आला Oppo चा दमदार Smartphone
By सिद्धेश जाधव | Published: April 15, 2022 07:47 PM2022-04-15T19:47:37+5:302022-04-15T19:47:47+5:30
Oppo A57 स्मार्टफोन 8GB RAM, Mediatek Dimensity 810 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे.
Oppo आपला 5G स्मार्टफोनच्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. यावेळी कंपनीनं मिड-बजेट सेगमेंटमध्ये पाय टाकला आहे. Oppo A57 नावाचा स्मार्टफोन आपल्या होम मार्केट चीनमध्ये सादर केला आहे. यात 8GB RAM, Mediatek Dimensity 810 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी, असे फीचर्स मिळतात. कंपनीनं फोनची किंमत देखील परवडणारी ठेवली आहे.
Oppo A57 ची किंमत
हा फोन चीनमध्ये 1,500 युआन (सुमारे 18,000 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. या फोनचा एकच व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन चीनच्या बाहेत कधी येईल, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.
Oppo A57 चे स्पेसिफिकेशन
Oppo A57 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते, जी 10W च्या चार्जिंगला सपोर्ट करते.
Oppo A57 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.56-इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट आणि 720 x 1,612 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसरवर चालणार हा डिवाइस 8GB RAM आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह येतो. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते.