11GB RAM सह लाँच झाला OPPO A76 4G फोन; 5000mAh ची बॅटरी देईल भरपूर बॅकअप  

By सिद्धेश जाधव | Published: February 19, 2022 03:16 PM2022-02-19T15:16:08+5:302022-02-19T15:16:36+5:30

OPPO A76 स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 11GB RAM देण्यात आला आहे.

OPPO A76 4G launch with 33W SuperVOOC Snapdragon 680 price specs sale  | 11GB RAM सह लाँच झाला OPPO A76 4G फोन; 5000mAh ची बॅटरी देईल भरपूर बॅकअप  

11GB RAM सह लाँच झाला OPPO A76 4G फोन; 5000mAh ची बॅटरी देईल भरपूर बॅकअप  

googlenewsNext

OPPO नं आपल्या लोकप्रिय ‘ए’ सीरीजमध्ये OPPO A76 4G नावाचा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. OPPO A76 स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 680 चिपसेट आणि 11GB RAM देण्यात आला आहे. कंपनीनं हा डिवाइस मलेशियात सादर केला आहे, परंतु लवकरच हा स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला देखील येऊ शकतो.  

OPPO A76 ची किंमत 

मलेशियामध्ये या फोनची किंमत 899 RM ठेवण्यात आली आहे. ही किंमत 16,000 भारतीय रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. ओप्पो ए76 4जी मोबाईल Glowing Blue आणि Glowing Black कलरमध्ये विकत घेता येईल. 

OPPO A76 चे स्पेसिफिकेशन्स 

ओप्पो ए76 स्मार्टफोनमध्ये कंपनीनं 6.56 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे. हा पंच-होल आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड कलरओएस 11.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 6 जीबी रॅम आणि 5 जीबी व्हर्च्युअल रॅम असा एकूण 11 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफीसाठी मोबाईलच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स सोबत साईड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे. तर पावर बॅकअपसाठी 33W SuperVOOC चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळते.  

हे देखील वाचा:

Web Title: OPPO A76 4G launch with 33W SuperVOOC Snapdragon 680 price specs sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.