5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आले Oppo चे दोन स्मार्टफोन, किंमत कमी पण स्पेसिफिकेशन जोरदार

By सिद्धेश जाधव | Published: March 17, 2022 07:00 PM2022-03-17T19:00:19+5:302022-03-19T11:21:10+5:30

Oppo A76 आणि Oppo A96 असे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आले आहेत. कंपनीनं या फोन्सची किंमत 20,000 रुपयांच्या आत ठेवली आहे.  

Oppo A76 Oppo A96 Launch With 5000mah Battery In India Price Specifications Details  | 5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आले Oppo चे दोन स्मार्टफोन, किंमत कमी पण स्पेसिफिकेशन जोरदार

5,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आले Oppo चे दोन स्मार्टफोन, किंमत कमी पण स्पेसिफिकेशन जोरदार

Next

Oppo A76 आणि Oppo A96 असे दोन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट, ड्युअल रियर, 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. यातील Oppo A76 च्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये आहे. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह Oppo A96 स्मार्टफोन 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Oppo A76 चे स्पेसिफिकेशन्स 

ओप्पो ए76 फोनमध्ये 6.56-इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा फोन Android 11 आधारित ColorOS 11.1 वर चालतो. यात Snapdragon 680 प्रोसेसरसह 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. फोनच्या मागे 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP ची पोट्रेट लेन्स मिळते. फ्रंटला 8MP चा सेन्सर आहे. यातील 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Oppo A96 चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo A96 स्मार्टफोन 6.59-इंचाच्या फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा हा फोन Android 11 बेस्ड ColorOS 11.1 वर चालतो. यात क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसरसह 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP च्या मुख्य कॅमेऱ्याला 2MP च्या सेन्सरची जोड देण्यात आली आहे. हा फोन 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यातील 5,000mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Oppo A76 Oppo A96 Launch With 5000mah Battery In India Price Specifications Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.