फेस अनलॉक फिचर्सयुक्त ओप्पो ए८३

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 12:29 PM2017-12-30T12:29:55+5:302017-12-30T12:30:28+5:30

ओप्पो कंपनीने कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने फेस अनलॉक करण्याची सुविधा असणारा ओप्पो ए८३ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

Oppo A83 with Face Unlock Fits | फेस अनलॉक फिचर्सयुक्त ओप्पो ए८३

फेस अनलॉक फिचर्सयुक्त ओप्पो ए८३

Next

ओप्पो कंपनीने कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने फेस अनलॉक करण्याची सुविधा असणारा ओप्पो ए८३ हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

फिंगरप्रिंट स्कॅनरच्या पलीकडे जात आता स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील अद्ययावत फिचर म्हणजे आयफोनच्या ताज्या आवृत्तींमध्ये असणारे फेस आयडी होय. याच पध्दतीने कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजियन्स तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा ओप्पो ए८३ या मॉडेलमध्ये देण्यात आली आहे. याच्या व्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये एखाद्या मिड-रेंज स्मार्टफोनमधील फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. 

ओप्पो ए८३ या मॉडेलमध्ये १८:९ गुणोत्तराचे प्रमाण असणारा ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा (१४४० बाय ७२० पिक्सल्स), २.५डी वक्राकार ग्लास डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ऑक्टा-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलर ओएस ३.२ वर हा स्मार्टफोन चालणार आहे. ओप्पो ए८३ स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हाच कॅमेरा फेस अनलॉक फिचरमध्ये वापरण्यात आला आहे. यात युजरच्या चेहर्‍यावरील १२८ पॉइंटच्या आधारे अवघ्या ०.१८ सेकंदात फोन अनलॉक केला जातो. तर यात ३०९० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. पहिल्यांदा हा स्मार्टफोन चीनमध्ये मिळणार आहे.

Web Title: Oppo A83 with Face Unlock Fits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल