Oppo च्या स्मार्टफोन्सना मिळेल या महिन्यात अँड्रॉइड 11 अपडेट; बघा तुमचा फोन आहे का या यादीत?
By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2021 04:43 PM2021-06-15T16:43:53+5:302021-06-15T16:45:11+5:30
Oppo ColorOS 11 Update: Oppo ने भारतात अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस अपडेट मिळणाऱ्या स्मार्टफोन्सची यादी जाहीर केली आहे. या फोन्सना या महिन्यात अपडेट देण्यात येईल.
स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने या महिन्यात भारतात अँड्रॉइड 11 चा अपडेट मिळणाऱ्या स्मार्टफोन्सची घोषणा केली आहे. या फोन्सना अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 चा अपडेट मिळेल. (Oppo smartphones will start gettin Android 11 based ColorOS update in June)
कंपनीने सांगितले आहे कि Oppo A53 ला 17 जून तर Oppo F17 ला 26 जूनपासून अँड्रॉइड 11 अपडेट मिळण्यास सुरुवात होईल. तर Oppo A54 आणि Oppo Reno ला ColorOS 11 बीटा व्हर्जन अपडेट अनुक्रमे 17 जून आणि 26 जूनपासून मिळण्यास सुरुवात होईल.
Oppo A5 2020 आणि Oppo A9 2020 मध्ये फक्त 3GB रॅम असल्यामुळे या डिवाइसेजना अँड्रॉइड 11 अपडेट देण्यात येणार नाही, अशी ओप्पोने माहिती दिली आहे.
उपरोक्त स्मार्टफोन्स व्यतिरिक्त पुढील ओप्पो स्मरफोन्सना या महिन्यात अँड्रॉइड 11 अपडेट देण्यात येईल:
- OPPO A52
- OPPO A5 2020
- OPPO A9 2020
- OPPO F11
- OPPO F11 Pro
- OPPO F11 Pro Marvel’s Avengers Limited Edition
- OPPO F15
- OPPO F17 Pro
- OPPO Find X2
- OPPO Reno 10x Zoom
- OPPO Reno
- OPPO Reno2 F
- OPPO Reno2 Z
- OPPO Reno2
- OPPO Reno3 Pro
- OPPO Reno4 Pro
ColorOS 11 मध्ये थ्री फिंगर ट्रान्सलेट, फ्लेक्सड्रॉप असे फिचर मिळतील. तसेच युजर्सना स्क्रीन रेकॉर्डर, चांगले मीडिया कंट्रोल्स, स्मार्ट होमी कंट्रोल, वन टाइम परमिशन असे अँड्रॉइड 11 मधील फीचर्स देखील मिळतील.