कमी किंमतीत OPPO Enco Buds भारतात लाँच; गेमर्ससाठी खास गेम मोड सादर
By सिद्धेश जाधव | Published: September 8, 2021 02:50 PM2021-09-08T14:50:12+5:302021-09-08T14:50:30+5:30
OPPO Enco Buds Price: OPPO Enco Buds मध्ये कंपनीने 8mm चा ऑडियो ड्रायव्हर दिला आहे, जो SBC आणि AAC कोडॅक्सला सपोर्ट करतो.
ओपोने आपला ऑडिओ ऍक्सेसरीज पोर्टफोलियोमध्ये वाढ केली आहे. कंपनीने OPPO Enco Buds इयरबड्स भारतात लाँच केले आहेत. देशात सादर झालेले हे Enco सीरीजमधील हे सहावे TWS इयरबड्स आहेत. जे ग्राहक पहिल्यांदाच TWS इयरबड्स वापरण्याचा विचार करत आहेत अश्या लोकांसाठी हे बड्स कंपनीने सादर केले आहेत. म्हणूनच OPPO Enco Buds ची किंमत कंपनीने कमी ठेवली आहे.
OPPO Enco Buds किंमत
OPPO Enco Buds ची किंमत कंपनीने 1,999 रुपये ठेवली आहे. परंतु इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत हे बड्स पहिल्या तीन दिवसांत 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येतील. या इयरबड्सचा सेल 14 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 16 सप्टेंबरपर्यंत इंट्रोडक्टरी ऑफर सुरु राहील. कंपनीने हे इयरबड्स व्हाइट आणि ब्लू रंगात सादर केले आहेत.
OPPO Enco Buds चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
OPPO Enco Buds मध्ये कंपनीने 8mm चा ऑडियो ड्रायव्हर दिला आहे, जो SBC आणि AAC कोडॅक्सला सपोर्ट करतो. कॉल्सच्या वेळी बॅकग्राऊंड नॉइज रिमूव्ह करण्यासाठी यात इंटेलिजेंट कॉल नॉइज रिडेक्शन फिचर देण्यात आला आहे. तसेच गेमर्ससाठी यात 80ms लो लेटेंसी Game Mode देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या बड्समध्ये Bluetooth 5.2 देण्यात आला आहे. या 10 मीटर रेंज असलेले हे इयरबड्स ऑटोमॅटिक पेयरिंगमुळे त्वरित कनेक्ट होतात.
OPPO Enco Buds मध्ये 400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चार्जिंग केसच्या मदतीने सिंगल चार्जमध्ये 24 तासांचा बॅकअप मिळतो, या केसमध्ये चार्जिंगसाठी USB-C पोर्ट मिळतो. 40mAh च्या बॅटरीसह येणारे बड्स मात्र 6 तासांचा बॅकअप मिळतो. कंपनीने हे इयरबड्स इन-इयर डिजाइनसह सादर केले आहेत. यातील टच कंट्रोल युजर्स आपल्या सोयीनुसार कस्टमाइज करू शकतात. हे ओपोचे लेटेस्ट TWS इयरबड्स IP54 रेटिंगसह येतात, आणि याचे वजन फक्त 4 ग्राम आहे.