11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस
By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 07:50 PM2021-09-22T19:50:56+5:302021-09-22T19:51:14+5:30
Oppo F19S Price In India: ओपो एफ19एस स्मार्टफोनचा एक प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन इथेच खरेदीसाठी उपलब्ध होईल हे निश्चित झाले आहे.
OPPO आपल्या ‘एफ19’ लाईनअपचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. या सीरिजमधील OPPO F19, OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus स्मार्टफोन नंतर आता OPPO F19s स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हा फोन 27 सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटच्या माध्यमातून सादर केला जाईल आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ओपो एफ19एस स्मार्टफोनचा एक प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन इथेच खरेदीसाठी उपलब्ध होईल हे निश्चित झाले आहे. 27 सप्टेंबरला होणाऱ्या ऑनलाईन लाँच इव्हेंटची माहिती कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवरून दिली आहे.
OPPO F19s चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
ओपो एफ19एस स्मार्टफोनमध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियोसह 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा नवीन ओपो मोबाईल अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालेल. मोबाईलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट दिला जाऊ शकतो. लीकनुसार OPPO F19s मध्ये 6 जीबी रॅम आणि 5जीबी एक्सटेंडेड रॅम मिळेल. या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.
फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर असेल. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. कंपनी फोनच्या फ्रॉन्टला 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याचा वापर करू शकते.