ओपोचा धमाकेदार फोन भारतीय लाँचच्या उंबरठयावर; OPPO F19s स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: September 13, 2021 05:12 PM2021-09-13T17:12:44+5:302021-09-13T17:12:51+5:30

Oppo F19S Launch Date: OPPO F19s फोन 10 ऑक्टोबरला CPH2223 मॉडेल नंबरसह ब्लूटूथ एसएजीवर लिस्ट करण्यात आला आहे.

Oppo f19s bluetooth sig certified launch soon  | ओपोचा धमाकेदार फोन भारतीय लाँचच्या उंबरठयावर; OPPO F19s स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट 

ओपोचा धमाकेदार फोन भारतीय लाँचच्या उंबरठयावर; OPPO F19s स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट 

googlenewsNext

OPPO F19s स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता हा फोन सर्टिफिकेशन साईट Bluetooth SIG वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमुळे या फोन लवकरच देशात येईल हे मात्र निश्चित झाले आहे. OPPO F19s फोन 10 ऑक्टोबरला CPH2223 मॉडेल नंबरसह ब्लूटूथ एसएजीवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमध्ये मॉडेल नंबरसह फोनच्या नावाचा म्हणजे ‘ओपो एफ19एस’ चा उल्लेख करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.  

ओपोचा आगामी स्मार्टफोन OPPO F19s नावाने भारतात सादर केला जाईल. विशेष म्हणजे हा फोन सर्वप्रथम भारतातच सादर केला जाणार आहे. आगामी सणासुदीच्या दिवसांचा फायदा घेण्यासाठी हा फोन सादर केला जाऊ शकतो.  हा एक मिडरेंज स्मार्टफोन आहे त्यामुळे या फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असू शकते, अशी माहिती टेक वेबसाईट 91मोबाईल्सने दिली आहे. भारतात ‘एफ’ सीरीज अंतगर्त OPPO F19, OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus असे तीन स्मार्टफोन उपलब्ध आहेत.  

OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G 

OPPO F19 Pro आणि F19 Pro Plus स्मार्टफोन्समध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियोसह 6.4 इंचाचा एफएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हे दोन्ही फोन अँड्रॉइड 11 सह कलरओएस 11.1 वर चालतात. OPPO F19 Pro मध्ये मीडियाटेक हीलियो पी95 चिपसेट वर तर OPPO F19 Pro+ मीडियाटेकच्या डायमनसिटी 800यू चिपसेटसह बाजारात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी ओपोचे दोन्ही नवीन स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48MP चा मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2MP ची पोर्टरेट लेंस आणि 2MP ची मोनो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हे फोन 16MP च्या फ्रंट कॅमेर्‍याला सपोर्ट करतात. OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus 5G स्मार्टफोनमध्ये  4,310एमएएच मोठी बॅटरी आहे. एफ19 प्रो मध्ये 30W VOOC Flash Charge 4.0 टेक्नोलॉजी देण्यात आली आहे तर एफ19 प्रो प्लस स्मार्टफोन 50W Flash Charge टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो.  

Web Title: Oppo f19s bluetooth sig certified launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.