11GB रॅमसह OPPO F19s भारतात लाँच; शानदार लूकसह मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: September 27, 2021 06:29 PM2021-09-27T18:29:09+5:302021-09-27T18:29:41+5:30
Latest Oppo Phone Oppo F19s Price In India: OPPO F19s फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड अश्या आकर्षक रंगात सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत कंपनीने 19,990 रुपये ठेवली आहे.
ओप्पोने आपल्या ‘एफ’ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन OPPO F19s भारतात सादर केला आहे. हा फोन ग्लोइंग ब्लॅक आणि ग्लोइंग गोल्ड अश्या आकर्षक रंगात सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत कंपनीने 19,990 रुपये ठेवली आहे, जो येत्या 3 ऑक्टोबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
OPPO F19s चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो एफ19एस मध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिस्प्ले डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा एक अॅमोलेड पॅनल आहे त्यामुळे यात इन-डिस्प्ले फिंगप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
या ओप्पो मोबाईलमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 662 चिपसेटचा वापर कंपनीने केला आहे. OPPO F19s अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 वर चालतो. त्याचबरोबर यात 6GB रॅम आणि 5GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आहे.
OPPO F19s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.