Oppo च्या आगामी फोनचा लूक पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; Oppo F21 Pro सीरीज येतेय भारतात
By सिद्धेश जाधव | Published: March 30, 2022 07:37 PM2022-03-30T19:37:01+5:302022-03-30T19:37:39+5:30
Oppo F21 Pro सीरीज भारतात 12 एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.
Oppo F21 Pro सीरीज येत्या 12 एप्रिलला भारतात लाँच केली जाईल. ओप्पो इंडियानं स्वतःहून याची माहिती दिली आहे. या सीरीजमध्ये Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro+ हे दोन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला येतील. यासाठी कंपनीनं खास मायक्रोसाइट देखील आपल्या वेबसाईटवर लाईव्ह केली आहे. इथून आगामी ओप्पो फोन्सच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार 12 एप्रिल संध्याकाळी 5 वाजता Oppo F21 Pro सीरिज भारतात येईल. या सीरिजमध्ये इंडस्ट्रीत सर्वप्रथम फायबरग्लास लेदर डिजाइनचा वापर करण्यात येईल. मायक्रोसाइटवरून फोन्समधील 64MP प्रायमरी कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे. परंतु हा Oppo F21 Pro चा कॅमेरा आहे की Oppo F21 Pro+ हे समजले नाही. Oppo F21 Pro सीरिज इंडोनेशियात आलेल्या Oppo Reno 7 4G चा रीब्रँड व्हर्जन वाटत आहे.
Oppo Reno 7 4G चे स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 7 4G स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटवर चालतो. फोनमध्ये Snapdragon 680 प्रोसेसरसह 8GB RAM आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.