स्लिक आणि स्टायलिश OPPO F21 सीरीजचे तीन फोन होणार लाँच; देणार का शाओमीला टक्कर  

By सिद्धेश जाधव | Published: December 4, 2021 12:03 PM2021-12-04T12:03:20+5:302021-12-04T12:03:40+5:30

Oppo F21 Series India Launch: Oppo F21 सीरीजची माहिती समोर आली आहे. या सीरीज अंतगर्त OPPO F21, OPPO F21 Pro, आणि OPPO F21 Pro+ स्मार्टफोन लाँच केली जाऊ शकतात.  

Oppo f21 series india launch expected in march 2022  | स्लिक आणि स्टायलिश OPPO F21 सीरीजचे तीन फोन होणार लाँच; देणार का शाओमीला टक्कर  

स्लिक आणि स्टायलिश OPPO F21 सीरीजचे तीन फोन होणार लाँच; देणार का शाओमीला टक्कर  

Next

Oppo F21 Series India Launch: OPPO आपल्या ‘एफ’ सीरिज अंतर्गत नेहमीच आकर्षक स्मार्टफोन सादर करत असते. सध्या या सीरिजमध्ये F19 लाईनअप उपलब्ध आहे. परंतु आता कंपनीच्या Oppo F21 सीरीजची माहिती समोर आली आहे. ही सीरिज पुढील वर्षी 2022 च्या पहिल्या तिमाहीत सादर केली जाईल, अशी माहिती 91मोबाईल्सनं दिली आहे. या सीरीज अंतगर्त OPPO F21, OPPO F21 Pro, आणि OPPO F21 Pro+ स्मार्टफोन लाँच केली जाऊ शकतात.  

91मोबाईल्सच्या रिपोर्टनुसार, Oppo F21 स्मार्टफोन मार्च 2022 मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच OPPO F21 Pro+ आणि OPPO F21 स्मार्टफोन भारतात 17 ते 21 मार्च दरम्यान सादर केले जाऊ शकतात. सीरिजमधील OPPO F21 Pro स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती मात्र मिळाली नाही. परंतु लवकरच ती माहिती देखील समोर येईल, अशी अपेक्षा आहे.  

अलीकडेच आलेल्या OPPO F19s चे स्पेसिफिकेशन्स   

ओप्पो एफ19एस मध्ये 6.43-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच-होल डिस्प्ले डिजाईनसह सादर करण्यात आलेला हा डिस्प्ले 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे त्यामुळे यात इन-डिस्प्ले फिंगप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.    

या ओप्पो मोबाईलमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 662 चिपसेटचा वापर कंपनीने केला आहे. OPPO F19s अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 वर चालतो. त्याचबरोबर यात 6GB रॅम आणि 5GB एक्सटेंडेड रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आहे.   

OPPO F19s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.    

Web Title: Oppo f21 series india launch expected in march 2022 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.