सॅमसंगच्या अडचणीत वाढ! लाँच होण्याआधीच OPPO Fold स्मार्टफोनची डिजाइन झाली लीक 

By सिद्धेश जाधव | Published: November 10, 2021 05:37 PM2021-11-10T17:37:21+5:302021-11-10T17:39:48+5:30

Oppo Foldable Phone: OPPO Fold याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये सादर केला जाऊ शकतो. ओप्पोच्या फोल्डेबल फोनमध्ये वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल.

Oppo fold smartphone design leaked before launch  | सॅमसंगच्या अडचणीत वाढ! लाँच होण्याआधीच OPPO Fold स्मार्टफोनची डिजाइन झाली लीक 

सॅमसंगच्या अडचणीत वाढ! लाँच होण्याआधीच OPPO Fold स्मार्टफोनची डिजाइन झाली लीक 

Next

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनचे खूप कौतुक टेक विश्वात केले जाते. परंतु आता दक्षिण कोरियन सॅमसंगला चिनी OPPO कडून या सेगमेंटमध्ये आव्हान मिळणार आहे. 2019 मध्ये ओप्पोने फोल्डेबल स्मार्टफोनचा प्रोटोटाइप सादर केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी OPPO X 2021 नावाचा रोलेबल फोन देखील समोर आला होता. तर आता रिपोर्ट्समधून ओप्पोच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे.  

91Mobiles ने OPPO च्या फोल्डेबल फोनची माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये 2019 साली CNIPA वर सबमिट केलेल्या पेटंटचे फोटो शेयर करण्यात आले आहेत. या पेटंटवरून आगामी ओप्पो फोल्डेबल फोनची डिजाईनची माहिती मिळाली आहे. OPPO Fold याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

OPPO Fold ची डिजाईन  

पेटंट इमेजनुसार आगामी फोल्डेबल स्मार्टफोनच्या डावीकडे पॉवर बटन आणि वॉल्यूम अप/डाउन बटन देण्यात येईल. हा फोन Huawei Mate X सारखा दिसत आहे. त्यामुळे यात इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन डिस्प्ले मिळणार नाहीत. या फोनमध्ये एकच डिस्प्ले मिळेल जो बाहेरून फोल्डेबल असेल.  

ओप्पोच्या फोल्डेबल फोनमध्ये वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल. तसेच फोनच्या वरच्या बाजूला सिम स्लॉट देण्यात येईल, तळाला USB Type-C चार्जिंग पोर्ट आणि स्पिकर ग्रिल मिळेल. हा 2019 मधील पेटंटच्या डिजाईनमध्ये कंपनी लाँचच्या वेळी काही बदल करू शकते. या फोनमधील प्रोसेसर, कॅमेरा सेन्सर्सची माहिती मात्र अजूनही समोर आलेली नाही.  

Web Title: Oppo fold smartphone design leaked before launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.