घासल्यावर देखील येणार नाही या फोनवर स्क्रॅच; खिशाला परवडणारा Oppo K10 5G येतोय भारतात  

By सिद्धेश जाधव | Published: June 4, 2022 03:38 PM2022-06-04T15:38:29+5:302022-06-04T15:38:39+5:30

Oppo K10 5G भारतात येत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. हा हँडसेट स्क्रॅच रेजिस्टन्स बॅक पॅनलसह सादर करण्यात येईल.  

Oppo K10 5G Will Launch In India On June 8 With Scratch Resistance Back Panel   | घासल्यावर देखील येणार नाही या फोनवर स्क्रॅच; खिशाला परवडणारा Oppo K10 5G येतोय भारतात  

घासल्यावर देखील येणार नाही या फोनवर स्क्रॅच; खिशाला परवडणारा Oppo K10 5G येतोय भारतात  

googlenewsNext

Oppo K10 5G स्मार्टफोन भारतात लाँच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कंपनीच्या ट्विटनुसार हा हँडसेट 8 जून 2022 रोजी देशात सादर केला जाईल. दुपारी 12 वाजता लाँच इव्हेंट सुरु केला जाईल. हा हँडसेट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल, अशी माहिती देखील मिळाली आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये स्क्रॅच रेजिस्टंट बॅक पॅनल देण्यात येईल असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. त्यामुळे हा स्लिम स्मार्टफोनवर स्क्रॅच पडणार नाहीत.  

भारतात येण्याआधी एप्रिलमध्ये Oppo K10 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे. परंतु चीनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येणारा हा डिवाइस भारतात ड्युअल कॅमेऱ्यासह येईल, असं फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमधून समजलं आहे. तसेच भारतीय मॉडेलची डिजाईन देखील चिनी व्हेरिएंटपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे भारतात येणारा ओप्पो के10 5जी फोन चीनमधील ओप्पो के10 5जी पेक्षा वेगळा असू शकतो.  

चीनमधील Oppo K10 5G चे स्पेसिफिकेशन्स 

ओप्पो के10 5जी मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी एलसीडी पॅनल देण्यात आला आहे, जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं याला पांडा ग्लासची सुरक्षा दिली आहे. अँड्रॉइड 12 आधारित डिवाइस कलरओएस 12 चालतो. मीडियाटेक डिमेनसिटी 8000 मॅक्स चिपसेटसह यात एआरएम ओडिन एमसी6 जीपीयू देण्यात आला आहे. 

फोटोग्राफीसाठी ओप्पो के10 5जी ट्रिपल रियर आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरसह यात बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 67W SuperVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळते.   

Web Title: Oppo K10 5G Will Launch In India On June 8 With Scratch Resistance Back Panel  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.