12GB RAM सह येऊ शकतो OPPO K9s स्मार्टफोन; 64MP कॅमेऱ्यासह वेबसाईटवर लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 03:39 PM2021-10-13T15:39:17+5:302021-10-13T15:39:24+5:30
OPPO K9s Phone Specifications Price and Details: ओप्पो के9एस सर्टिफिकेशन साइट टेनावर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या आगामी फोनची माहिती मिळाली आहे.
ओप्पोने काही दिवसांपूर्वी ‘के’ सीरीज अंतर्गत OPPO K9 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने हा मिडरेंज स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. आता या सीरीजमध्ये अजून एक नवीन फोन आणण्याची तयारी कंपनी करत आहे जो OPPO K9s नावाने लाँच होईल. हा फोन सर्टिफिकेशन टेनावर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या डिवाइसच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
OPPO K9s चे लीक स्पेसिफिकेशन्स
ओप्पो के9एस सर्टिफिकेशन साइट टेनावर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगनुसार या फोनमध्ये 6.59 इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले फुलएचडी+ (1080 x 2412) पिक्सल रिजोल्यूशनआणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या डिवाइसला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची पॉवर देण्यात येईल. हा फोन 8GB व 12GB रॅम व्हेरिएंट आणि 128GB आणि 256GB अशा स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. हा एक अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा फोन असेल.
फोटोग्राफीसाठी OPPO K9s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा सेन्सर असेल. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा दुसरा आणि 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर मिळू शकतो. या डिवाइसमधील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. ओप्पो के9एस मध्ये 4,880एमएएचची बॅटरी मिळू शकते. ही बॅटरी 30वॉट रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाऊ शकतो, त्यानंतर हा डिवाइस जागतिक बाजारात लाँच केला जाईल.