10.36 इंचाचा मोठा डिस्प्ले, 7100mAh ची राक्षसी बॅटरी असलेला Oppo Pad Air येणार भारतात 

By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2022 04:17 PM2022-06-21T16:17:06+5:302022-06-21T16:17:24+5:30

Oppo Pad Air टॅबलेट आता भारत लाँच करण्याची तयारी ओप्पो करत आहे.  

Oppo Pad Air May Launch In India Soon Spotted On Bis Certification Site   | 10.36 इंचाचा मोठा डिस्प्ले, 7100mAh ची राक्षसी बॅटरी असलेला Oppo Pad Air येणार भारतात 

10.36 इंचाचा मोठा डिस्प्ले, 7100mAh ची राक्षसी बॅटरी असलेला Oppo Pad Air येणार भारतात 

Next

Oppo टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण केल्यानंतर Oppo Pad Air टॅबलेट गेल्या महिन्यात चीनमध्ये सादर केला होता. वाढती मागणी पाहून गेले कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या अँड्रॉइड टॅबलेट सेक्शनमध्ये अजून एका खेळाडूची एंट्री झाली. Oppo चा नवीन टॅबलेट भारतात येणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. लेटेस्ट लीकमध्ये हा डिवाइस आता Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसल्याच सांगण्यात आलं आहे.  

टिप्सटर मुकुल शर्मानं Oppo Pad Air टॅबलट मॉडेल नंबर OPD2102A सह Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट केला आहे. त्यामुळे हा डिवाइस लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच, हा टॅब जुलैमध्ये देशात लाँच होईल, या काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीला आता दुजोरा मिळाला आहे. चीनप्रमाणे भारतात देखील Oppo Pad Air सोबत Oppo Reno 8 सीरीज येऊ शकते. चीनमध्ये Oppo Reno 8, Oppo Reno 8 Pro आणि Oppo Reno 8 Pro+ स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत.  

Oppo Pad Air चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo Pad Air मध्ये 10.36-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2000 x 1200 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. टॅबलेटला Qualcomm Snapdragon 680 ची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. सोबत 6GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. Oppo Pad Air टॅब Android 12-बेस्ड ColorOS वर चालतो.   

फोटोग्राफीसाठी टॅबमध्ये 8MP चा सिंगल रियर कॅमेरा मिळतो, तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. टॅबलेटमध्ये 7100mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Oppo Pad Air May Launch In India Soon Spotted On Bis Certification Site  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.