ओप्पो स्मार्टफोन युजर्सना मिळणार भन्नाट फिचर; सॉफ्टवेयर अपडेटनंतर वाढवता येणार स्मार्टफोनचा रॅम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 02:43 PM2021-07-02T14:43:14+5:302021-07-02T14:45:50+5:30

Oppo extended RAM Update: Oppo ने गेल्या महिन्यात आपल्या स्मार्टफोन्समध्ये वर्चुअल रॅम देण्यास सुरुवात केली होती. या टेक्नॉलॉजीचा वापर करून ओप्पो स्मार्टफोन युजर त्यांच्या स्मार्टफोनचा रॅम वर्चुअली वाढवू शकतील.  

Oppo releasing update for the option to avail virtual ram on some phones  | ओप्पो स्मार्टफोन युजर्सना मिळणार भन्नाट फिचर; सॉफ्टवेयर अपडेटनंतर वाढवता येणार स्मार्टफोनचा रॅम 

हे प्रतीकात्मक छायाचित्र आहे.

googlenewsNext

स्मार्टफोनमध्ये फिजिकल रॅमसोबत वर्च्युल रॅम देण्याचा ट्रेंड सध्या सुरु झाला आहे. याची सुरुवात विवो स्मार्टफोन्सपासून करण्यात आली होती. काही नवीन iQOO आणि Realme स्मार्टफोन्समध्ये देखील ही सुविधा देण्यात आली आहे. यात आता Oppo च्या नावाची भर पडली आहे. गेल्या महिन्यात हे फिचर सिंगापूरमधील युजरसाठी सादर केल्यानंतर आता ओप्पोने मध्य पूर्व आणि आफ्रिकन देशांमध्ये वर्च्युल रॅमचा अपडेट देण्यास सुरुवात केली आहे. Oppo ने स्मार्टफोनसाठी सादर केलेली ही टेक्नॉलॉजी युजरच्या स्मार्टफोनची इंटरनल मेमोरी रॅममध्ये रूपांतरित करते.  

वर्च्युल रॅम म्हणजे काय  

तुम्ही जेव्हा फोन घेता तेव्हा त्यात फिजिकल रॅम देण्यात येतो. ही रँडम ऍक्सेस मेमरी वाढवता येत नाही. परंतु वर्च्युल रॅम टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही तुमच्या फोनमधील इंटर्नल मेमरीचा रॅम म्हणून वापर करू शकता. Oppo च्या काही स्मार्टफोन्समध्ये 7GB पर्यंत अतिरिक्त व्हर्चुला रॅम मिळवता येईल.  

या नवीन टेक्नॉलॉजीमुळे हायएंड गेम्स जे खेळण्यासाठी जास्त RAM ची गरज असते ते सहज खेळात येतील. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने Oppo युजर्स त्यांच्या बजेट फोनमध्ये अतिरिक्त वर्च्युल रॅम वापरून हाय ग्राफिक्स असेलेले गेम खेळू शकतील.  

अशाप्रकारे वापरता येईल वर्च्युल रॅम  

हे नवीन फिचर Oppo च्या स्मार्टफोन्समध्ये नवीन अपडेटच्या माध्यमातून देण्यात येईल. यासाठी युजर्सना त्याच्या फोन सेटिंग्समध्ये जावे लागेल. तिथे About Phone सेक्शनमध्ये वर्च्युल मेमोरी अलोकेट करण्याचा पर्याय दिसेल. वर्च्युल रॅम अलोकेट केल्यानंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करावा लागेल.  

ओप्पोने हे नवीन फीचर A94, A74 आणि Reno5 स्मार्टफोनसाठी रोलआउट केले आहे, अशी माहिती रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे. अलीकडेच आलेल्या June 2021 च्या अपडेटमध्ये हे फीचर देण्यात आले आहे. भारतात देखील लवकरच हे फिचर उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.  

Web Title: Oppo releasing update for the option to avail virtual ram on some phones 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.