44MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno6 4G लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: July 28, 2021 05:32 PM2021-07-28T17:32:55+5:302021-07-28T17:33:24+5:30
OPPO Reno 6 4G Launch: OPPO Reno6 4G सध्या इंडोनेशिया मध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा एकमेव 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 5,199,000 IDR मध्ये सादर करण्यात आला आहे.
OPPO ने काही दिवसांपूर्वी भारतात आपल्या ‘रेनो 6’ सीरीजमध्ये Oppo Reno6 आणि Oppo Reno6 Pro हे दोन 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. या फोन्समध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला अॅमोलेड डिस्प्ले, 64MP क्वाड कॅमेरा आणि 50W फास्ट चार्जिंग असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. परंतु, आता ओपोने या फोनचा 4G मॉडेल सादर केला आहे. कंपनीने Qualcomm Snapdragon 720G चिपसेटसह Oppo Reno6 4G सादर केला आहे.
OPPO Reno6 4G ची किंमत आणि उपलब्धता
OPPO Reno6 4G सध्या इंडोनेशिया मध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा एकमेव 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 5,199,000 IDR मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत भारतीय चलनात 26,500 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते.
OPPO Reno6 4G चे स्पेसिफिकेशन्स
ओपो रेनो 6 4जी मध्ये कंपनीने 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर चालतो.
OPPO Reno6 4G मधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेन्सर देण्यात आला आहे. हा 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच या फोनमधील 4,310एमएएचची बॅटरी 50वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये कधी लाँच होईल याची माहिती देण्यात आली नाही.