OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro 5G लवकरच येणार भारतात; Flipkart वर झाले लिस्ट
By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2021 05:33 PM2021-06-30T17:33:51+5:302021-06-30T17:34:19+5:30
Oppo Reno 6 & Reno 6 pro teased: OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro हे दोन्ही स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
OPPO Reno 6 आणि OPPO Reno 6 Pro लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता वाढली आहे. ओप्पोचे हे दोन्ही स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साईट Flipkart वर लिस्ट करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्ससाठी बनवण्यात आलेल्या माइक्रोसाइटवर OPPO Reno 6 series कमिंग सून असे लिहिण्यात आले आहे. यामुळे OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार हे निश्चित झाले आहे. ओप्पोने चीनमध्ये Oppo Reno 6 सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. (Oppo Reno 6 and Reno 6 Pro 5G to Launch in India Soon)
OPPO Reno 6 आणि Reno 6 Pro च्या फ्लिपकार्ट लिस्टिंगमध्ये कोणत्याही लाँच डेटचा उल्लेख करण्यात आला नाही. हे दोन्ही स्मार्टफोन जुलैच्या पहिल्या आठवड्यात सादर केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. अजूनतरी कंपनीने लाँच डेटबाबत कोणतीही अधिकृत माहिती सांगितली नाही.
Oppo Reno 6 चे स्पेसिफिकेशन्स
Oppo च्या आगामी Oppo Reno 6 मध्ये 6.43 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन FullHD+ 2400 x 1080 पिक्सल आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 900 SOC आणि Mali G78 जीपीयू देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 11 आधारित ColorOS 11.3 कस्टम युजर इंटरफेस मिळतो.
Oppo Reno 6 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Reno 6 मध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4300mAh ची बॅटरी मिळते जे 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चीनमध्ये Oppo Reno 6 CNY 2,799 (अंदाजे 32,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे.