लाँचपूर्वीच समोर आले दमदार Oppo Reno 6Z चे स्पेसिफिकेशन्स; कमी किंमतीत मिळतील भारी फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2021 12:19 PM2021-06-15T12:19:23+5:302021-06-15T12:21:00+5:30
Oppo Reno 6z: OPPO लवकरच Reno 6Z स्मार्टफोन लाँच करणार आहे. Reno 6 सिरीजमधील इतर फोन्सप्रमाणे हा फोन देखील चीनमध्ये सर्वप्रथम लाँच केला जाईल.
OPPO लवकरच Reno 6Z स्मार्टफोन लाँच करणार आहे. Reno 6 सिरीजमधील इतर फोन्सप्रमाणे हा फोन देखील चीनमध्ये सर्वप्रथम लाँच केला जाईल. Oppo Reno6, Oppo Reno6 Pro, आणि Oppo Reno6 Pro+ नंतर हा या या सिरीजमधील चौथा फोन असेल. ओप्पोचा हा स्मार्टफोन मलेशियाच्या SIRIM सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट झाला होता, त्यामुळे याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने Oppo Reno 6Z स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.
[ Exclusive ]
— Abhishek Yadav (@yabhishekhd) June 14, 2021
Oppo Reno 6Z specifications
- Mediatek Dimensity 800u
- 30 Watt charging
- 60hz refresh rate#OppoReno6Z#Reno6Z#Oppo
Oppo Reno 6Z संभाव्य स्पेसिफिकेशन्स
टिपस्टर अभिषेक यादवने दिलेल्या माहितीनुसार, आगामी Oppo Reno 6Z Mediatek Dimensity 800u चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. तसेच ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 30W फास्ट चार्ज सपोर्ट दिला जाऊ शकतो. Reno 6Z मधील डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनबाबत इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.
यापूर्वी या सिरीजमध्ये लाँच झालेल्या Reno6 Pro आणि Reno6 Pro+ चे स्पेसिफिकेशन्स पाहता, या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एकसारखा 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला होता. या फोनचा रिफ्रेश रेट 90Hz होता. Reno6 Pro स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 चिपसेट तर Pro+ स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 870 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जसह सादर केला गेले आहेत.