Oppo Reno 7 Pro: OPPO चे दोन जबराट 5G Phones येतायत भारतात; किंमत आली समोर 

By सिद्धेश जाधव | Published: November 29, 2021 07:11 PM2021-11-29T19:11:35+5:302021-11-29T19:12:18+5:30

Oppo Reno 7 Pro: Oppo Reno 7 5G आणि Reno 7 Pro 5G ची भारतीय किंमत समोर आली आहे. त्याचबरोबर कंपनी नवीन TWS इयरबड्स देखील लाँच करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Oppo reno 7 5g Phone and reno 7 pro smartphones india price leaked  | Oppo Reno 7 Pro: OPPO चे दोन जबराट 5G Phones येतायत भारतात; किंमत आली समोर 

Oppo Reno 7 Pro: OPPO चे दोन जबराट 5G Phones येतायत भारतात; किंमत आली समोर 

googlenewsNext

OPPO नं गेल्याच आठवड्यात आपली Reno 7 सीरीज जागतिक बाजारात लाँच केली आहे. कंपनीनं या सीरिजमध्ये तीन फोन सादर केले आहेत. त्यातील दोन 5G Phones भारतीय बाजारात येणार असल्याची माहिती 91मोबाईल्सनं दिली आहे. Oppo Reno 7 5G आणि Reno 7 Pro 5G ची भारतीय किंमत समोर आली आहे. परंतु Reno 7 SE 5G सध्यातरी देशात येणार नाही.  

Oppo Reno 7 Pro and Reno 7 Price in India  

रिपोर्टनुसार OPPO Reno 7 5G Phone ची भारतीय किंमत 28 ते 31 हजार रुपयांच्या आत असेल. तर सीरिजमधील Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 41 ते 43 हजार रुपयांच्या आत ठेवली जाऊ शकते. त्याचबरोबर कंपनी नवीन TWS इयरबड्स देखील लाँच करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  

OPPO Reno 7 Pro 5G चे स्पेसिफिकेशन   

6.55 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह Reno 7 Pro बाजारात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. ओप्पोनं फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड कलरओएस 12 वर चालतो.  रेनो7 प्रो 5जी फोनला MediaTek Dimensity 1200 Max चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. हा ओप्पो फोन 12GB पर्यंतच्या LPDDR4x RAM सह बाजारात आला आहे आणि त्याला 256GB पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजची जोड देण्यात आली आहे.   

या डिवाइसमध्ये 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेन्सर सेल्फी फ्रंट कॅमेऱ्याचं काम करतो. तर बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.  OPPO Reno 7 Pro 5G मधील बॅटरी देखील तेवढीच खास आहे. कंपनीनं यात ड्युअल बॅटरीचा वापर केला आहे, म्हणजे फोनमध्ये दोन बॅटरी सेल आहेत. ज्या प्रत्येकी 2,250एमएएचच्या क्षमतेसह येतात आणि मिळून 4,450एमएएचची पॉवर देतात. ही बॅटरी 65W सुपर फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.   

OPPO Reno 7 5G चे स्पेसिफिकेशन्स  

OPPO Reno 7 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अ‍ॅमोलेड पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा मिळते. फोनचे मॉर्निग गोल्ड, स्टारी नाईट ब्लॅक आणि स्टार रेन विश हे तीन कलर व्हेरिएंट आले आहेत. OPPO Reno 7 5G अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.   

Reno 7 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. पॉवर बॅकअपसाठी हा ओप्पो फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीने काही मिनिटांत चार्ज करता येईल.   

Web Title: Oppo reno 7 5g Phone and reno 7 pro smartphones india price leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.