12GB RAM सह Oppo नं आणला जबराट 5G Phone; वेगवान चार्जिंगसह आकर्षक डिजाईन
By सिद्धेश जाधव | Published: December 27, 2021 01:09 PM2021-12-27T13:09:18+5:302021-12-27T13:09:39+5:30
Oppo Reno 7 5G Phone: Oppo Reno 7 5G new year edition लाँच झाला आहे. या फोनमध्ये 64MP कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग आणि 12GB रॅम देण्यात आला आहे.
Oppo नं Oppo Reno 7 5G New Year Edition सादर केला आहे. हा नवीन कलरसह बाजारात आलेला स्पेशल एडिशन आहे. या फोनसाठी कंपनीनं लोगो देखील बदलला आहे. हा फोन यावर्षी नोव्हेंबरमध्ये आलेल्या Oppo Reno 7 सीरीजचा स्पेशल एडिशन अशे. त्यामुळे रंग वगळता इतर स्पेक्स आणि फीचर्स तसेच ठेवण्यात आले आहेत.
Oppo Reno 7 5G New Year Edition ची किंमत
Oppo Reno 7 5G New Year Edition चीनमध्ये लाँच झाला आहे. डिवाइसच्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,699 युआन (जवळपास 31,800 रुपये), 8GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजची किंमत 2,999 युआन (जवळपास 35,400 रुपये) आणि 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3,299 युआन (जवळपास 38,900 रुपये) आहे. ही खास आवृत्ती Velvet Red या आकर्षक रंगात विकत घेता येईल.
Oppo Reno 7 5G New Year Edition चे स्पेसिफिकेशन्स
OPPO Reno 7 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अॅमोलेड पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा मिळते. फोनचे मॉर्निग गोल्ड, स्टारी नाईट ब्लॅक आणि स्टार रेन विश हे तीन कलर व्हेरिएंट आले आहेत.
OPPO Reno 7 5G अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.
Reno 7 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. पॉवर बॅकअपसाठी हा ओप्पो फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीने काही मिनिटांत चार्ज करता येईल.
हे देखील वाचा:
सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास
अँड्रॉईड फोनवर या 8 चुका करत असाल तर, घोटाळेबाजांना तुम्हीच मदत करताय