Oppo Reno 7 Pro 5G: ओप्पोचा दमदार 5G Phone भारतात येण्यासाठी सज्ज; 50MP कॅमेरा आणि फ्लॅगशिप प्रोसेसरसह होणार लाँच
By सिद्धेश जाधव | Published: December 9, 2021 07:28 PM2021-12-09T19:28:43+5:302021-12-09T19:30:08+5:30
Oppo Reno 7 Pro 5G: Oppo Reno 7 Pro 5G भारतात 12GB RAM, MediaTek Dimensity 1200 Max चिपसेट, 90Hz रिफ्रेश रेट, 50MP Camera, 65W फास्ट चार्जिंग आणि 32MP Selfie Camera अशा फीचर्ससह बाजारात येईल.
Oppo नं गेल्या माहितण्यात Reno 7 सीरीज सादर केली होती. या सीरिजमध्ये Oppo Reno 7, Reno 7 Pro आणि Reno 7 SE असे तीन फोन चीनमध्ये सादर करण्यात आले होते. आता ही सीरिज भारतीय बाजारात पदार्पण करणार असल्याचं दिसत आहे. सीरिजमधेही Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोनचा ग्लोबल व्हेरिएंट SIRIM आणि BIS सर्टिफिकेशन्स साईटवर दिसला आहे.
Oppo Reno 7 Pro 5G Phone India Launch
ओप्पो रेनॉ 7 प्रो 5जी स्मार्टफोन SIRIM, Geekbench आणि भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमुळे हा फोन लवकरच भारतीय बाजारात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या ग्लोबल आणि चिनी व्हर्जनमध्ये जास्त फरक नसल्याचं दिसत आहे.
OPPO Reno 7 Pro 5G चे स्पेसिफिकेशन
रेनो7 प्रो 5जी फोनला MediaTek Dimensity 1200 Max चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. हा ओप्पो फोन 12GB पर्यंतच्या LPDDR4x RAM सह बाजारात आला आहे आणि त्याला 256GB पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजची जोड देण्यात आली आहे.
6.55 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह Reno 7 Pro बाजारात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. ओप्पोनं फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड कलरओएस 12 वर चालतो.
या डिवाइसमध्ये 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेन्सर सेल्फी फ्रंट कॅमेऱ्याचं काम करतो. तर बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.
OPPO Reno 7 Pro 5G मधील बॅटरी देखील तेवढीच खास आहे. कंपनीनं यात ड्युअल बॅटरीचा वापर केला आहे, म्हणजे फोनमध्ये दोन बॅटरी सेल आहेत. ज्या प्रत्येकी 2,250एमएएचच्या क्षमतेसह येतात आणि मिळून 4,450एमएएचची पॉवर देतात. ही बॅटरी 65W सुपर फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते.
OPPO Reno 7 Pro 5G ची किंमत
OPPO Reno 7 Pro स्मार्टफोनचा 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेल 3699 युआन (सुमारे 43,000 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 3999 युआन (सुमारे 46,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.